राज्य रोजगारयुक्त करु या

By Admin | Updated: May 2, 2015 01:05 IST2015-05-02T01:05:08+5:302015-05-02T01:05:08+5:30

राज्यातील सरकार गरीब, मजूर व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही दु:खदायक बाब आहे.

Make the state employable | राज्य रोजगारयुक्त करु या

राज्य रोजगारयुक्त करु या

चंद्रपूर : राज्यातील सरकार गरीब, मजूर व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही दु:खदायक बाब आहे. त्यामुळे या घटना शून्यावर आणत रोजगारयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करु या, असे आवाहन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपुरातील पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनाचा मुख्यसमारंभ पार पडला. यावेळी ते जनतेला दिलेल्या संदेशात बोलत होते. महाराष्ट्र दिनाच्या समारंभाला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचलार्वार, माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर ना. मुनगंटीवार यांनी जिल्हावासियांना संबोधित केले. ते म्हणाले, चंद्रपूर जिल्हयात चंद्रपूर- बल्लारपूर मार्गावर सातारा येथील सैनिकी शाळेच्या धर्तीवर १२२ एकर जागेवर सैनिकी शाळा उभारण्याचे प्रस्तावित आहे. दारिद्रय रेषेखालील विविध घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वत:ची जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणारी अभिनव पं. दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना नुकतीच अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभाथ्यार्ला घरकुलासाठी जागा खरेदी करण्याकरिता ५० हजार रूपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेसाठी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दजार्चे पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करण्यासाठी शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकांचा विकास तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तपोभूमी गोंदोडाच्या स्थळांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
दारुबंदीकडून व्यसनमुक्तीकडे वाटचाल करावयाची आहे. यासाठी नागरिक व तरुण वर्गाच्या सहकार्याची गरज असल्याचे ते म्हणाले. जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना आदी योजनेत जिल्हयाने प्रगती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रादरम्यान जलयुक्त शिवार प्रचार रथाला पालकमंत्र्यांनी दाखविली. तत्पूर्वी विविध पुरस्कारप्राप्त अधिकारी-कर्मचारी व खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस विभागाकडून त्यांनी मानवंदानाही यावेळी स्विकारली. या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Make the state employable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.