स्वस्थ महाराष्ट्र अभियानाला यशस्वी करा
By Admin | Updated: May 29, 2017 00:32 IST2017-05-29T00:32:39+5:302017-05-29T00:32:39+5:30
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाला यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करा,...

स्वस्थ महाराष्ट्र अभियानाला यशस्वी करा
हंसराज अहीर : जिवती येथे नेत्र तपासणी व चष्मे वाटप
राजुरा : पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाला यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करा, असे केंद्रीय मंत्री ना. हंसराज अहीर यांनी आवाहन जिवती येथे आयोजित नेत्र तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.
या प्रसंगी राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे यांनी जिवती तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, राजुरा विधानसभाप्रमुख खुशाल बोंडे, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, गोदावरी केंद्रे, कमलाबाई राठोड, सुनील मडावी, महेश देवकते, जिल्हा परिषद सदस्य सुनील उरकुडे, नूतन जीवने, सुनंदा डोंगे, नयना परचाके, बळीराम देवकते, अरुण मस्की, बादल बेले, केशव गिरमाजी, मधुकर नरड, मनोहर कुळसंगे, शिवाजी सेलोकर, अशोक सोनी, शामराव गेडाम, दत्ता राठोड, अनुसया राठोड, गोपीनाथ चव्हाण, सुरेंद्र केंद्रे, प्रल्हाद पवार, सुरेश धोटे, नारायण हिवरकर, डॉ. अलोक दोषी, डॉ.शंकर बुऱ्हाण, डॉ.किशोर लांजेवार, डॉ. मनोज खुबरीकर, डॉ.साईद सय्यद, डॉ. शेख वसीम, डॉ. उपासन साहू, डॉ. शाहबाज शेख, उपमहापौर अनिल फुलझेले उपस्थित होते.
प्रास्ताविक महेश देवकते यांनी केले. संचालन राजेश राठोड यांनी केले. आभार शंकर गेडाम यांनी मानले.
हंसराज अहीर यांच्या
हस्ते चष्मे वाटप
नेत्र तपासणी शिबिरानंतर रुग्णांना केंद्रीय मंत्री ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते चष्मे वाटप करण्यात आले.
रात्रभर मुक्काम
केंद्रीय मंत्री ना. हंसराज अहीर जिवती तालुक्यातील विविध समस्यांच माहिती घेण्याकरिता रात्री मुक्काम करणार असून परिसरातील समस्या ऐकूण त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे. याप्रसंगी नवनिर्वाचित पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार करण्यात आला.