जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By Admin | Updated: November 18, 2015 01:17 IST2015-11-18T01:17:04+5:302015-11-18T01:17:04+5:30

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थती आहे. शेतकऱ्यांना अनंत अडचणींना सामना करावा लागत आहे.

Make the district declare drought | जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

किसान सभा : तोहगाव येथे जिल्हा अधिवेशन
चंद्रपूर : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थती आहे. शेतकऱ्यांना अनंत अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेने केली आहे. या समस्येला घेऊन तोहगाव येथे १९ नोव्हेंबर रोजी जिल्हा अधिवेशन आयोजित आहे.
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने येत्या १९ नोव्हेंबरला तोहगाव येथे जिल्हा अधिवेशन होणार असून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही शासनाचे लक्ष नाही. महापूर येणाऱ्या नद्या आहेत, पण त्यापासून शेतीला सिंचन मिळणारे कालवे नाहीत. त्यामुळे शेती उद्योग पूर्णत: अवलंबून आहे. संपूर्ण जिल्हा दिवसेंदिवस अधिक मागास होत चालला आहे. या समस्यांवर हे किसान अधिवेशन असून विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
शासन शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावाचे संरक्षण देत नाही. त्यामुळे शेतकरी भरडला जात आहे. या स्थितीतून मार्ग काढणारे धोरण आले पाहिजे. त्या दृष्टीने या अधिवेशनात काही ठराव घेण्यात येणार आहे. या अधिवेशनाला मार्गदर्शन करण्यासाठी किसान सभेचे राज्य सरचिटणीस नामदेवराव गावडे उपस्थित राहतील.
सुनील घटाळे, अमोल मारकवार, देवराव चवळे, विनोद झोगडे यांचीही उपस्थिती राहणार आहे. वनजमिनीचे पट्टे मिळावे, तीन पिढ्यांची अट शिथिल करावी, तोहगाव ते पाचगावपर्यंतचा रस्ता पाच फूट उंच करावा, अशी शेतकरी-शेतमजुरांना पेन्शन देण्याचा कायदा करण्यात यावा यासह अन्य मागण्या शासनाकडे लावून धरण्याचा संकल्प करण्यात येणार आहे, असे आयोजकांनी कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Make the district declare drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.