दारुबंदी करा ; अन्यथा दारु वाटप करू

By Admin | Updated: December 31, 2014 23:22 IST2014-12-31T23:22:21+5:302014-12-31T23:22:21+5:30

जिल्ह्यातील महिलांची अनेक वर्षांपासून दारुबंदीची मागणी आहे. महिलांनी महाराष्ट्राचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा निवडणुकीत खुले समर्थन दिले होते.

Make alcohol; Otherwise, you'll distribute the ammunition | दारुबंदी करा ; अन्यथा दारु वाटप करू

दारुबंदी करा ; अन्यथा दारु वाटप करू

चंद्रपूर : जिल्ह्यातील महिलांची अनेक वर्षांपासून दारुबंदीची मागणी आहे. महिलांनी महाराष्ट्राचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा निवडणुकीत खुले समर्थन दिले होते. निवडणुक जिंकल्यानंतर मुनंगटीवार यांनी एक ते दीड महिन्यात दारुबंदीची अधिकृत घोषणा करण्याचे आश्वासन दिले होते. मुनगंटीवार यांना अर्थ नियोजन व वन कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. कॅबिनेटच्या अनेक बैठकी व हिवाळी अधिवेशन पार पडले. मात्र, दारुबंदी अद्याप झालेली नाही. जिल्ह्यात तत्काळ दारुबंदी करावी, अन्यथा नागरिकांना दारु वाटप करु, असा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे. मावळत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्र्यांच्या घरासमोर नागरिकांना प्रहार संघटनेतर्फे दूध वाटप करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Make alcohol; Otherwise, you'll distribute the ammunition