मैत्रेय प्रतिनिधी व गुंतवणूकदारांचे आमदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:06 IST2018-07-08T23:06:24+5:302018-07-08T23:06:52+5:30

मैत्रेय कंपनीमध्ये जिल्ह्यातील अनेक जनसामान्य नागरिकांनी गुंतवणूक केली. मात्र त्यांना एकही पैसा मिळाला नाही. परिणामी गुंतवणूकदार व प्रतिनिधींचे मानसिक संतुलन ढासळत असून आर्थिक समस्या उद्भवत आहे.

Maitreya representatives and investors' MLAs | मैत्रेय प्रतिनिधी व गुंतवणूकदारांचे आमदारांना साकडे

मैत्रेय प्रतिनिधी व गुंतवणूकदारांचे आमदारांना साकडे

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : गुंतवणूकदारांच्या पैशाचा प्रश्न अधिवेशनात मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : मैत्रेय कंपनीमध्ये जिल्ह्यातील अनेक जनसामान्य नागरिकांनी गुंतवणूक केली. मात्र त्यांना एकही पैसा मिळाला नाही. परिणामी गुंतवणूकदार व प्रतिनिधींचे मानसिक संतुलन ढासळत असून आर्थिक समस्या उद्भवत आहे. त्यामुळे नाशिक येथील न्यायालयाचा निकाल संपूर्ण राज्यभर लागू करावा, कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करून ग्राहकांच व प्रतिनिधींचे पैसे परत करावे, आदी मागण्यांचे निवेदन जिल्ह्यातील मैत्रेय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदारांनी नागपूर येथे आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले.
मैत्रेय कंपनीमध्ये राज्यातील २२ लाख प्रतिनिधी काम करीत असून तब्बल दोन हजार ८०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली. मात्र सदर कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्यापासून गुंतवणूकदारांचे पैसे मिळाले नसल्याने मोठी अडचण जात असल्याने गुंतवणूकदारांनी सदर प्रश्न अधिवेशानात उचलावा, या मागणीसाठी आमदार वडेट्टीवार यांना निवेदन दिले.
सरकार जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास तत्पर नसल्यामुळे मैत्रेयमध्ये गुंतवणूक केलल्या गुंवतणूकदारांची रक्कम मिळण्यास विलंब होत आहे. मैत्रेयमध्ये गुंतवणूकीमुळे अनेकांची मेहनतीची कमाई अडकून पडली आहे. मात्र गुंतवणूकदारांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी आपण पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे बैठक लावणार यासोबतच सभागृहाबाहेरही आवाज उठविण्याची ग्वाही काँग्रेसचे विधीमंडळ उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी दिली. यावेळी असंघटीत कामगार संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक शेख जैन्नुद्दीन, सिध्दार्थ जगताप, प्रविण बावणे, दिवाकर रागीट, मंगेश खेल्लुरकर, शिला टाले, सुमित्रा कुचनकर, माया पेंदोर, छाया निमगडे, माया नंनुरवार, वंदना कातवडे, वनिता खेल्लुरकर, राजेश पाटील, धनराज बहादे यांच्यासह अनेक गुंतवणूकदार व एंजट उपस्थित होते.

Web Title: Maitreya representatives and investors' MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.