मुद्रित माध्यमावरील विश्वासार्हता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:14 IST2021-01-13T05:14:20+5:302021-01-13T05:14:20+5:30
बल्लारपूर प्रेस असोसिएशनच्या वतीने येथील मार्कंडा देवस्थान सभागृहात पत्रकार दिन व उल्लेखनीय व्यक्तींचा सत्कार कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी अध्यक्षीय ...

मुद्रित माध्यमावरील विश्वासार्हता कायम
बल्लारपूर प्रेस असोसिएशनच्या वतीने येथील मार्कंडा देवस्थान सभागृहात पत्रकार दिन व उल्लेखनीय व्यक्तींचा सत्कार कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. समाजात उल्लेखनीय व प्रशंसनीय काम केल्याबद्दल श्रुती लोणारे, शब्बीर अली व बाबुसिंग बिलारिये यांचा आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती यांनी मनोगत व्यक्त केले. पद्मशाली समाजाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष राजू गुंडेटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार मुनगंटीवार यांचा सत्कार केला. प्रास्ताविक वसंत खेडेकर, सूत्रसंचालन प्रा. योगेश खेडेकर तर आभार मंगेश बेले यांनी मानले. बल्लारपूर प्रेस असोसिएशनचे अनिल पांडे, संजय कुमार पोद्दार, श्रीनिवास कुंदकुरी, राजेश खेडेकर, अनिल देठे, गणेश राहिकवार तसेच मान्यवरांची उपस्थिती होती.