लोकशाहीची हत्या करणारे महाविकास आघाडी सरकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:58+5:302021-07-07T04:34:58+5:30
राजुरा : ओ.बी.सी. आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज उठविणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमध्ये राज्य शासनाने ...

लोकशाहीची हत्या करणारे महाविकास आघाडी सरकार
राजुरा : ओ.बी.सी. आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज उठविणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमध्ये राज्य शासनाने लोकशाहीची हत्या केल्याचा आराेप माजी आमदार संजय धोटे यांनी केला असून, यासंदर्भात त्यांनी राज्यपालांना निवेदन पाठविले आहे. अधिवेशनामध्ये आमदारांना बोलू न देणे हे हुकूमशाहीचे धोरण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांचा अपमान केला असून, अशा प्रकारे सरकार सुडाचे राजकारण करीत आहे. या सरकारच्या या लोकशाही व ओबीसीविरोधी धोरणाचा त्यांनी निवेदनाद्वारे निषेधही नोंदविला असून, आमदारांचे निलंबन त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.
शिष्टमंडळात भाजप जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, भाजप तालुका महामंत्री दिलीप वांढरे, भाजप तालुका महामंत्री प्रशांत घरोटे, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय उपगनलावार, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, भाजयुमो तालुका महामंत्री रवी बुरडकर, भाजप नेते महादेव तपासे, चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर, माजी सरपंच हंसराज रागीट, ग्रामपंचायत सदस्य रवी गायकवाड, जनार्धन निकोडे, कैलास कार्लेकर, प्रशांत साळवे, आकाश रागीट, परदेशी दंडीकवार आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
060721\img-20210706-wa0150.jpg
माजी आमदार संजय धोटे निवेदन दिले