महाशिवरात्रीच्या पर्वावर ‘स्वाईन फ्लू’ची धास्ती !

By Admin | Updated: February 17, 2015 01:25 IST2015-02-17T01:25:26+5:302015-02-17T01:25:26+5:30

मूल शहरात डुकरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून त्यांचे वास्तव्य शहरातील वॉर्डावॉर्डात आहे.

Mahashivratri fears 'Swine Flu' | महाशिवरात्रीच्या पर्वावर ‘स्वाईन फ्लू’ची धास्ती !

महाशिवरात्रीच्या पर्वावर ‘स्वाईन फ्लू’ची धास्ती !

डुकरांचे प्रमाण अधिक : शहराबाहेर हाकलण्याची मागणी
राजू गेडाम ल्ल

मूल शहरात डुकरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून त्यांचे वास्तव्य शहरातील वॉर्डावॉर्डात आहे. ‘स्वाईन फ्ल्यू’चा आजार मुख्यत: डुकरांमुळे होत असल्याने ‘स्वाईन फ्लू’ ची शक्यता बळावली आहे. मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त लाखो लोकांना मूलमध्ये यावे लागते. मात्र स्वाईन फ्ल्यूमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. डुकरांना शहराबाहेर हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
महाशिवरात्री उद्यापासून सुरू होत असून दूरवरून लाखो जनता मूल शहरातून ये-जा करीत असतात. मार्कंडा यात्रेच्या पार्श्वभूमीवर येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत यंदा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरात असलेले डुकरांचे प्रमाण अधिक आहे. याचबरोबर शहरातील वॉर्डावॉर्डात तुटलेल्या नाल्या, डबके, उकीरड्यावरील अन्न यावर डुकराचा हैदोस सुरू असतो. त्यामुळे विविध आजारांना निमंत्रण दिले जात आहे. याच बरोबरच ‘स्वाईन फ्ल्यू’ ची शक्यता या निमित्याने बळावली आहे. स्वच्छतेसाठी लाखो रुपयांचे कंत्राट दिले. वेळोवेळी नालीचा उपसा करून स्वच्छता केली जाते. मात्र डुकरांचा सतत हैदोस सुरू असल्याने डासांचे प्रमाण वाढतच आहे. तुटलेल्या नाल्या, कच्च्या नाल्या, डबके यावर सतत डुकरे बसत असतात. डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासन पाहिजे त्या प्रमाणात संवेदनशिल नसल्याने आजाराचे प्रमाण वाढतच आहे. वॉर्ड नं. ११ मधील इंदिरा नगर वॉर्डात मटन मार्केट बरोबरच कोंबड्याचे मार्केट आहे. याच ठिकाणी उघड्यावर बकऱ्याची व कोंबड्याची कत्तल केली जाते व त्या वॉर्डानजिक परिसरात घाण टाकली जाते.त्यामुळे या वॉर्डात विविध आजारांची लागण नागरिकांना झाली असून रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. डुकरांचा बंदोबस्त करणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे.
डुकरांना शहराबाहेर हाकलू
मूल शहरात डुकरांचे प्रमाण जास्त आहे. डुकरांचे पालन करणाऱ्यांना नोटीस बजावणार असून लवकरात लवकर शहराबाहेर हाकलण्याची कारवाई करण्यात येत आहे.
- रवींद्र ढाके, मुख्याधिकारी, नगर पालिका, मूल
येथील नगर परिषदेतील आरोग्य विभाग संवेदनशिल नाही. वेळोवेळी मटन मार्केटमधील घाणीबाबत पालिकेला सांगण्यात येते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. घाणीमुळे डुकरांचा हैदोस वाढत असल्याने आजाराचे प्रमाण वाढत आहे. डुकरांना शहराबाहेर हटविण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना सांगितले आहे.
- मिलींद खोब्रागडे, सभापती न.प. मूल
नगर परिषदेने वॉर्डावॉर्डातील वराहपालकांना नोटीस देऊन मूल शहरातील डुकरांना शहराबाहेर हाकलण्याची कारवाई करावी. वराहपालक ऐकत नसतील तर पोलीस बंदोबस्त घेऊन त्यांच्या झोपड्या हटवाव्यात. याकडे नगरपालिकेने गंभीरतेने बघावे.
- मोती टहलियानी, माजी गटनेते तथा नगरसेवक न.प. मूल

आमदाराकडे गेले म्हणून शेतकऱ्याला धमकी
दोन वर्षांपासून मीटरसाठी पायपीट : ओलिताच्या शेतीपासून शेतकरी वंचित
राजुरा : तालुक्यातील भोयगाव येथील शेतकरी न्यायासाठी लोकप्रतिनिधी यांच्याकडे गेले म्हणून चक्क वीज अभियंत्यांने शेतकऱ्यांनाच धमकी दिली.
प्राप्त माहितीनुसार दोन वर्षापूर्वी २१ जून २०१३ ला भोयगाव येथील शेतकरी बळवंत चन्ने यांनी वीज मीटर करीता ४५५७६०००१७१३१७ या क्रमांकाचे चालान रक्कम पाच हजार दोनशे रूपये बॅकेत भरले. यानंतर खांब सुद्धा शेतामध्ये उभे करण्यात आले. मात्र राजुरा विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतात टाकलेले खांब उचलून इतरत्र हलविले. त्यामुळे दोन वर्षापासून सदर शेतकरी विद्युत विभागाकडे चकरा मारत आहे. मात्र काम झालेले नाही. त्यामुळे कंटाळलेल्या शेतकऱ्याने १३ फेब्रुवारीला राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्याकडे जाऊन मीटर देत नसल्याबाबत कैफीयत मांडली.
त्यामुळे आमदार धोटे यांनी संबंधित कनिष्ठ अभियंत्याला फोन केला व शेतकऱ्याला भेटण्यास सांगितले. शेतकरी जेव्हा विद्युत विभागाच्या कार्यालयात गेला, तेव्हा कनिष्ठ अभियंत्याने, ‘तु आमदाराकडे गेलाच का’ म्हणून शेतकऱ्याला धमकाविणे सुरू केले. ‘मी पण पाहून घेईन’ असेही बोलण्यात अभियंता विसरला नाही.
दोन वर्षांपासून वीज मीटर न दिल्याने शेतकरी ओलीताची शेती करू शकत नाही. या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी आहे. अधिकाऱ्यावंच्या या वृत्तीबद्दल नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)

 

Web Title: Mahashivratri fears 'Swine Flu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.