शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
2
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
5
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
6
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
7
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
8
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
9
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
10
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
11
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
12
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
13
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
14
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
15
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
16
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
18
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
19
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
20
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; भाजप केवळ दोन जागांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 2:02 PM

चंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये नगराध्यक्ष पदासह काँग्रेस आघाडीचे ९ उमेदवार विजयी झाल्याने स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये नगराध्यक्ष पदासह काँग्रेस आघाडीचे ९ उमेदवार विजयी झाल्याने स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यामध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता टेकाम 1104 मताधिक्याने विजयी झाल्या. काँग्रेसचे 5 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेना व शेतकरी संघटना एकत्र लढली. शिवसेनेचे 5 तर शेतकरी संघटनेचा 1 उमेदवार निवडून आले आहेत.

गडचांदूर नगर परिषदेत 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 7, काँग्रेस 5, शिवसेना 2, भाजप 3 असे पक्षीय बलाबल होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगराध्यक्ष पद होते. यावेळी आघाडीत हर पद काँग्रेसला मिळाले. आघाडीने पालिकेवर वर्चस्व कायम राखले. 2015 पासून अडीच वर्षे काँग्रेस, भाजप व शिवसेना युती होती. त्यावेळी नगराध्यक्षपद काँग्रेसकडे होते. उपनगराध्यक्षपद हे शिवसेनेकडे होते. नंतरचे अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप सत्तेवर आली. यावेळी नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपाध्यक्ष पद भाजपकडे होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष व गटनेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व पिरिपा आघाडी होती. यामध्ये आघाडीने नगराध्यक्ष पदासह 10 जागा जिंकल्या. यात नगराध्यक्ष पद काँग्रेस तसेच काँग्रेस 5, राष्ट्रवादी काँग्रेस 4 नगरसेवक निवडुन आले तर भाजपला 2 जागाच जिंकता आल्या. शिवसेना 5 तर शेतकरी संघटनेने 1 जागा जिंकली. शिवसेना, शेतकरी संघटना व गोंडवाना गणतंत्र पार्टीची युती होती. भाजप स्वतंत्र लढली.

टॅग्स :Electionनिवडणूक