महाआॅनलाईनने ६० लाख रुपये बुडविले
By Admin | Updated: September 29, 2014 00:41 IST2014-09-29T00:41:32+5:302014-09-29T00:41:32+5:30
राजुरा शहरात मागील दोन वषात अनेक घोटाळे उघडकीस आले. कधी दाम दुपटीचा घोटाळा तर कधी आरडीच्या फसवणुकीचा घोटाळा आता राजुरा तहसील कार्यालयात कॉम्प्युटर आॅपरेटर

महाआॅनलाईनने ६० लाख रुपये बुडविले
आॅपरेटर्स वेतनापासून वंचित : ११ कर्मचाऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा
राजुरा (चंद्रपूर) : राजुरा शहरात मागील दोन वषात अनेक घोटाळे उघडकीस आले. कधी दाम दुपटीचा घोटाळा तर कधी आरडीच्या फसवणुकीचा घोटाळा आता राजुरा तहसील कार्यालयात कॉम्प्युटर आॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांना मागील अडीच वर्षांपासून पगारच मिळाला नाही. या कर्मचाऱ्याचे वेतन ६० लाख रुपये होत असून ते बुडण्याची दाट शक्यता आहे. परिणामी येथील कर्मचारी पंकज गाडे यांनी त्वरित वेतन अदा न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा ‘लोकमत’शी बोलताना दिला.
महाआॅनलाईन कंपनीच्या प्रकल्प प्रबंधकांनी २ आॅक्टोबर २०११ ला परशुराम प्रधाने, पंकज गाडे, करुणा चिकाटे, आसमा सय्यद, वर्षा मडावी, विनोद जाधव, आशिष बावनवाडे, महेंद्र चौधरी, विठ्ठल ढोरे, दुर्गा मोटघरे, ख्वाजा शेख या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले. तेव्हा हे सर्व कर्मचारी नियमीतपणे सावली, राजुरा, कोरपना, मूल, बल्लारपूर, गोंडपिपरी, पोंभूर्णा, वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर, जिवती तहसील कार्यालयात डाटा एन्ट्रीचे काम मागील अडीच वर्षांपासून करीत आहे. परंतु अजुनपर्यंत त्यांना मानधन मिळालेले नाही. शासनाने ‘आम आदमी विमा योजना’ व विशेष सहाय्य योजनांसाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम महाआॅनलाईन लिमिटेड ही राज्य शासन आणि डाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस यांची राज्य शासनाच्या अधिकाराखालील स्थापन केलेली संयुक्त कंपनी आहे. संगणक चालक आऊटसोर्सींच्या तत्त्वावर नियुक्त करून या कर्मचाऱ्यांकडून चंद्रपूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयात काम करून घेतले. परंतु या कर्मचाऱ्यांचे मानधन जवळपास ६० लाख रुपये अजुनपर्यंत मिळाले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून त्वरित मानधन देण्याची मागणी पंकज गाडे सह सर्व कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. (शहर प्रतिनिधी)