मा.सा. कन्नमवार जयंतीनिमित्त २७ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST2021-01-13T05:13:25+5:302021-01-13T05:13:25+5:30

मूल : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चंद्रपूर व कर्मवीर महाविद्यालय मूल यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर मा. सा. ...

MA 27 people donated blood on the occasion of Kannamwar Jayanti | मा.सा. कन्नमवार जयंतीनिमित्त २७ जणांनी केले रक्तदान

मा.सा. कन्नमवार जयंतीनिमित्त २७ जणांनी केले रक्तदान

मूल : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चंद्रपूर व कर्मवीर महाविद्यालय मूल यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ मूलचे अध्यक्ष बाबासाहेब वासाडे हे होते. प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून समता परिषद चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, प्राचार्य डॉ. कराडे, शासकीय रक्तपेढी चंद्रपूरचे डॉ. उत्तम सावंत, डॉ. गुणवंत जाधव आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. बाबासाहेब वासाडे यांनी कर्मवीर कन्नमवार व माजी खासदार स्वर्गीय वि.तू. नागपुरे यांचे स्मरण करून त्यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला. रक्तदान शिबिरात २७ दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान संकलनाचे कार्य शासकीय रक्तपेढी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरचे डॉ.उत्तम सावंत, डॉ. गुणवंत जाधव, डॉ. दिनेश बांगर, डॉ. शुभांगी अगडे, लक्ष्मण नगराळे यांच्या चमूने केले. सूत्रसंचालन समीर अल्लूरवार यांनी केले. आभार प्रा. सिकंदर लेनगुरे यांनी मानले. यावेळी समता परिषदेच्या जिल्हा महिला कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, समता परिषदेचे सल्लागार युवराज चावरे, जिल्हा सहसंघटक ईश्वर लोनबले, देवराव ढवस,पुरुषोत्तम कुनघाडकर, सीमा लोनबले, विक्रांत मोहुर्ले, दुष्यंत महाडोळे आदी उपस्थित होते.

Web Title: MA 27 people donated blood on the occasion of Kannamwar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.