सखींच्या भरगच्च उपस्थितीत लकी ड्रॉ’चा बक्षिस वितरण सोहळा

By Admin | Updated: July 29, 2016 00:58 IST2016-07-29T00:58:32+5:302016-07-29T00:58:32+5:30

लोकमत सखी मंच चंद्रपूर येथे सखी ज्वेलर्स चंद्रपूरच्या वतीने लकी ड्रॉ काढण्यात आला. लोकमत सखीमंच सभासद नोंदणी २०१६ करीता ...

Lucky Draw's prize distribution ceremony in the presence of fans | सखींच्या भरगच्च उपस्थितीत लकी ड्रॉ’चा बक्षिस वितरण सोहळा

सखींच्या भरगच्च उपस्थितीत लकी ड्रॉ’चा बक्षिस वितरण सोहळा

लोकमत सखी मंच आणि सखी ज्वेलर्सचा संयुक्त उपक्रम
चंद्रपूर: लोकमत सखी मंच चंद्रपूर येथे सखी ज्वेलर्स चंद्रपूरच्या वतीने लकी ड्रॉ काढण्यात आला.
लोकमत सखीमंच सभासद नोंदणी २०१६ करीता सखी ज्वेलर्सच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील सखींसाठी फ्री गिफ्ट कुपन देण्यात आले आणि सखी ज्वेलर्स मधून फ्री गिफ्ट प्राप्त करणाऱ्या सखींसाठी विशेष लकी ड्रा काढण्यात आला. यात प्रथम क्रमांक दुर्गा पडगेलवार यांनी एक ग्रॅम सोन्याचा राणीहार, द्वितीय क्रमांक आशा भगत यांनी एक ग्रॅम सोन्याचा नेकलेस सेट तर तृतीय क्रमांकाचा बक्षिस माया येरणे यांनी एक ग्रॅम सोन्याच्या बांगड्या मिळविल्या. लकी ड्राचे बक्षिस वितरण सखी ज्वेलर्सचे संचालक निलेश निशाने, सुप्रसिद्ध गायक सुनिल वाघमारे, प्रा. डॉ. राजेश इंगोले. जितेंद्र चोरडिया, रमण बोथरा या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सध्या सखी ज्वेलर्सतर्फे सखींसाठी विशेष मान्सून आॅफर घोषित करण्यात आली असून यात ५० टक्के पर्यंत विशेष सूट एक ग्रॅम दागिण्याच्या खरेदीवर देण्यात असून याचा पुरेपूर लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील सखींनी घ्यावा, असे आवाहन सखी ज्वेलर्सतर्फे करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Lucky Draw's prize distribution ceremony in the presence of fans