बफर क्षेत्रातील ७९ गावांतील १६ हजार ३२८ कुटुंबांना एलपीजी
By Admin | Updated: August 24, 2016 00:31 IST2016-08-24T00:31:38+5:302016-08-24T00:31:38+5:30
ग्रामीण भागात अदयापही जळावू लाकडाचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो.

बफर क्षेत्रातील ७९ गावांतील १६ हजार ३२८ कुटुंबांना एलपीजी
७० गावे शंभर टक्के एलपीजीयुक्त : गावे होत आहेत चुलमुक्त
चंद्रपूर : ग्रामीण भागात अदयापही जळावू लाकडाचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. हा वापर कमी करुन जंगलाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी वनालगतच्या गावांना एलपीजी गॅसचा पुरवठा करण्याची योजना वनविभागातर्फे राबविण्यात येत आहे. जिल्हयात बफर क्षेत्रातील ७९ गावांना एलपीजीचा पुरवठा करण्यात आला असून ७० गावे शंभर टक्के एलपीजी युक्त झाली आहे.
जिल्हयात मोठया प्रमाणावर वनांचे क्षेत्र आहे. या क्षेत्रालगत अनेक गावे असून ही गावे जळावू लाकडांसाठी वनांवर आधारीत होती. लाकडासाठी झाडांची होणारी तोड थांबवून पर्यावरणासोबतच जिल्हयाचे अभयारण्य क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी एलपीजी गॅसचा पुरवठा केला जातो. जिल्हयातील अभयारण्य ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत बफर क्षेत्रामध्ये अनेक गावे आहेत. या गावातील कुटूंबांचे लाकडावरील अवलंबीत्व संपविण्यासाठी एलपीजी गॅस पुरवठयाची मोहिम हाती घेण्यात आली आहे.
बफर क्षेत्रातील ७९ गावांना आतापर्यंत एलपीजी गॅसचा पुरवठा करण्यात आला. त्यामधील २१ हजार ८६० कुटूंबापैकी १६ हजार ३२८ कुटूंबांना एलपीजी देण्यात आली आहे. चालू वर्षी तीन हजार २९१ कुटूंबांना एलपीजी पुरविण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे ७९ यापैकी तब्बल ७० गावातील शंभर टक्के कुटूंबांना गॅसचा पुरवठा करण्यात आल्याने ही गावे शंभर टक्के एलपीजी युक्त झाली आहे. या गावातील लाकडाचा वापर पूर्णपणे थांबला असल्याने ही गावे पर्यावरणास मोठया प्रमाणावर हात भार लावीत आहे. (स्थानिक प्रतीनिधी)
ंंंंशेगडी ठेवण्यासाठी ओट्याचे बांधकाम
विशेष बाब म्हणजे एलपीजी गॅसवर स्वयंपाक करतांना महिलांना सोईचे जावे, यासाठी गॅस शेगडी ठेवण्यासाठी वनविभागाकडून लाभार्थ्यांना ओटेही बांधून देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ५९ कुटूंबांना गॅस ओटे बांधून देण्यात आले आहे. त्यामध्ये चालू वर्षी तीन हजार २९ ओटे बांधून दिले जात असून ओट्यांचे बांधकाम सुरु आहे. वनविभागाच्या या उपक्रमामुळे कुटूंबांना दिलासा देण्यासोबतच जळावू लाकडासाठी वृक्षांची मोठया प्रमाणावर होणारी वृक्ष तोड थांबून पर्यावरणास हात भार लागत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील वनांची होणारी वृक्षतोड थांबविण्यास वनविभागाची मोहीम यशस्वी होत आहे.