नेरीतील वनविभागाचे कार्यालय जीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:42 IST2017-11-11T23:42:20+5:302017-11-11T23:42:34+5:30
चिमूर तालुक्यातील नेरी येथील वन विभागाच्या कार्यालयाची दूरवस्था झाली आहे. कार्यालयीन इमारत केव्हाही कोसळू शकते.

नेरीतील वनविभागाचे कार्यालय जीर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी येथील वन विभागाच्या कार्यालयाची दूरवस्था झाली आहे. कार्यालयीन इमारत केव्हाही कोसळू शकते. सध्या हे ठिकाण कुत्रे, मांजर यांचे आश्रयस्थान झाले आहे.
येथील वनविभाग तळोधी रेंज अंतर्गत येत असून येथे वनविभागाच्या क्षेत्र सहाय्यकाचा कारभार चालत असतो. पण यांना कार्यालयीन कामकाज चालविण्यासाठी हक्काची इमारत नसल्यामुळे भाड्याच्या खोलीतून कारभार चालविला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नेरी वन विभागाला अंदाजे पाच हजार चौरस फुटाची जागा असून येथील जुने कार्यालय रेती माती विटाची जुडाई असलेले आहे. त्यामुळे मोठे भगदाड पडलेले आहे. त्यावरील बेंगलोर कवेलूसुध्दा उडलेले आहेत. नवीन कार्यालयाच्या कामासाठी हक्काची इमारत हवी आहे. वन मंत्रालयातून निधी देण्याची गरज आहे.