लग्नवरातीवरील बंदीमुळे घोडे व्यावसायिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:30 IST2021-03-23T04:30:30+5:302021-03-23T04:30:30+5:30

शहर व परिसरात यात्रा, उत्सव व लग्नसराईत नवरदेवाच्या वरातीत मिरविण्यासाठी लागणारा घोडा देणारे व्यावसायिक आहेत. मार्च, एप्रिल, मे, जून ...

Loss of horse traders due to ban on weddings | लग्नवरातीवरील बंदीमुळे घोडे व्यावसायिकांचे नुकसान

लग्नवरातीवरील बंदीमुळे घोडे व्यावसायिकांचे नुकसान

शहर व परिसरात यात्रा, उत्सव व लग्नसराईत नवरदेवाच्या वरातीत मिरविण्यासाठी लागणारा घोडा देणारे व्यावसायिक आहेत. मार्च, एप्रिल, मे, जून आदी चार महिने लग्नसराईचा हंगाम असतो. मात्र, मागील वर्षी त्यांचा व्यवसाय गेला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या घटल्यानंतर पुन्हा लग्नसमारंभ सुरू झाले. यामुळे काही प्रमाणात का होईने हास्य फुलले. मात्र आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे लग्नसमारंभावर प्रतिबंध आला आहे. लग्नकार्य उरकते घेतले जात आहे. लग्न लागण्यापूर्वी नवरदेवाची मारुती मंदिरापासून ते लग्न मांडवापर्यंत मिरवणूक काढली जाते. काळानुरूप लग्न सोहळ्यात आधुनिकता आली असली तरी नवरदेवाची घोड्यावरून मिरवणूक काढण्याची हौस कायम आहे. शाही घोड्यासाठी मिरवणुकीचे ५ ते १० हजार रुपयांपर्यंत भाडे मोजावे लागते. परंतु कोरोनामुळे मिरवणुकीला बंधने आल्याने घोड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना फटका बसला आहे.

Web Title: Loss of horse traders due to ban on weddings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.