अंबुजा कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे शेतकऱ्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:19 IST2021-06-17T04:19:47+5:302021-06-17T04:19:47+5:30
फोटो गोवरी : उपरवाहीस्थित अंबुजा सिमेंट कंपनीच्या ट्रान्स्पोर्टनगर परिसरात असलेल्या पुलाच्या ब्लाकेजमुळे लगतच्या परिसरातील हरदोना (खु.) येथील शेतकरी शामराव ...

अंबुजा कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे शेतकऱ्याचे नुकसान
फोटो
गोवरी : उपरवाहीस्थित अंबुजा सिमेंट कंपनीच्या ट्रान्स्पोर्टनगर परिसरात असलेल्या पुलाच्या ब्लाकेजमुळे लगतच्या परिसरातील हरदोना (खु.) येथील शेतकरी शामराव राजूरकर यांच्या शेतात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुलालगत त्यांचे शेत लागून असून पाणी थोपल्याने पूर्ण पाणी शेतात घुसले. शेतात असलेल्या गोठ्यातील बैलजोडी, खत, औषधी, चारा पूर्णपणे वाहून गेला. पुलाचे बांधकाम छोट्या पाइपचे असल्यामुळे दरवर्षी पाणी थोपून राहते. शेतकऱ्यांनी वारंवार कंपनी अधिकाऱ्याला माहिती देऊन पूल वाढवण्याची विनंती केली होती; परंतु कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती घेऊन पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते बबनराव उरकुडे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित शेतकऱ्याला आर्थिक मदत करून पुलाचे नवीन बांधकाम करण्याची मागणी केली. याप्रसंगी तुफान गिरी, केतन बोभाटे, साईनाथ पिंपळशेंडे आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.