अयोध्येचा उत्साह... चंद्रपूरच्या घराघरात, गावागावात प्रभू श्रीरामाचा गजर!
By राजेश मडावी | Updated: January 22, 2024 17:51 IST2024-01-22T17:51:21+5:302024-01-22T17:51:40+5:30
जिल्हाभरातील घराघरांत व गावागावांत आज दिवसभर रामनामाचा गजर आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचा उत्साह दिसून आला.

अयोध्येचा उत्साह... चंद्रपूरच्या घराघरात, गावागावात प्रभू श्रीरामाचा गजर!
चंद्रपूर : ‘जय जय श्रीराम’च्या जयघोषात सोमवारी (दि. २२) अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या सोहळ्याच्या निमित्ताने चंद्रपूर व जिल्हाभरात अनेक ठिकाणी लावलेल्या स्क्रीनवर अयोध्येतील हा अपूर्व सोहळा बघितल्यानंतर भाविकांच्या मनात भक्तीचे स्फुल्लिंग उमटले.
जिल्हाभरातील घराघरांत व गावागावांत आज दिवसभर रामनामाचा गजर आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचा उत्साह दिसून आला. चंद्रपुरातील चौकाचाैकांत श्रीरामांच्या प्रतिमा व भगवे झेंडे आणि काही ठिकाणी अयोध्येतील राममंदिराची प्रतिकृती लावून भजन-आरती करण्यात आली. ग्रामीण भागातील मंदिरांमध्येही हेच चित्र होते. त्यामुळे जणू अयोध्या अवतरल्याचा अनुभव भाविकांनी. विविध ठिकाणी लावलेल्या स्टॉल्सवरून भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. चंद्रपुरातील बाजारपेठात दुकानदारांनीही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापनेचा आनंदोत्सव साजरा केला.