पेट्रोलपंपावर होतेय ग्राहकांची लूट
By Admin | Updated: October 8, 2014 23:23 IST2014-10-08T23:23:32+5:302014-10-08T23:23:32+5:30
चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात असलेल्या अनेक पेट्रोल पंपावर ग्राहकांची सर्रास लूट सुरु आहे. याकडे मात्र, पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.

पेट्रोलपंपावर होतेय ग्राहकांची लूट
चंद्रपूर : चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात असलेल्या अनेक पेट्रोल पंपावर ग्राहकांची सर्रास लूट सुरु आहे. याकडे मात्र, पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.
शहरातील अनेक पेट्रोलपंपावर डिझेल, पेट्रोलसाठी लॉक मशीन नाही. त्यामुळे या पंपावर आकड्यात मोठा खेळ खेळला जात आहे. शंभर रुपयाचे पेट्रोल टाकले तरी प्रत्यक्षात मात्र, शंभर रुपयाचे पेट्रोल मिळत नाही. ग्राहकाला मात्र, आपन शंभर रुपयाचे पेट्रोल टाकल्याचे आकड्यावरुन दिसून येते.
अनेक पेट्रोल पंपावर मशीनमध्ये तशी सेंटींग करुन ठेवण्यात आली असून आकड्यात आपन जेवढे रुपयाचे पेट्रोल टाकतो तेवढेच दाखविले जाते. मात्र, प्रत्यक्षात तेवढे पेट्रोल मिळत नाही. वाहनाच्या टंकीत एकदा पेट्रोल पडल्यावर पेट्रोल किती मिळाला याचा ग्राहकालाही अंदाज येत नाही. त्यामुळे पेट्रोलपंप चालकांचे चांगलेच फावत आहे.
मात्र, एखाद्या ग्राहकांकडून बॉटलमध्ये पेट्रोल खरेदी केले जाते, तेव्हा मात्र, आपली पोल खुलेल या भितीने पेट्रोल देण्यास चक्क नकार दिला जात आहे. हा प्रकार अनेक पेट्रोल पंपावर सुरु आहे. मात्र, पुरवठा विभाग सर्रास दुर्लक्ष करीत आहे. पेट्रोलमध्ये होत असलेली लूट ग्राहकाच्या निदर्शनास येत नाही. त्यामुळे ग्राहक तक्रार करीत नाही. एखादा ग्राहक पेट्रोल पंपावर लूट होत असल्याची ओरड केल्यासा पंपावर कार्यरत कर्मचारी त्याला मारहाण करुन हाकलून लावल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.
पंप चालकांची मनमानी सुरु असून लूट होत असली तरी निदर्शनास येत नसल्याने कारवाईही होत नाही. पुरवठा विभागाने याची तत्काळ दखल घेऊन ग्राहकांची लूट थांबवावी, पेट्रोल पंपाची नियमीत तपासणी करण्याची मागणी नाागरिकांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)