लोकमतच्या युवा दिंडीने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले
By Admin | Updated: December 22, 2016 01:51 IST2016-12-22T01:51:17+5:302016-12-22T01:51:17+5:30
लोकमत युवा नेक्स्ट, चंद्रपूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा क्रीडा संकुलात

लोकमतच्या युवा दिंडीने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले
चंद्रपूर : लोकमत युवा नेक्स्ट, चंद्रपूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा क्रीडा संकुलात ‘जल्लोष तरुणाईचा’ या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त चंद्रपुरातून सांस्कृतिक दिंडी काढण्यात आली. या दिंडीने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले.
मंगळवारी सकाळी ९.३० वाजता लोकमत जिल्हा कार्यालय परिसरातून या युवा दिंडीला लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी आनंद नागरी बँकेचे अध्यक्ष दीपक पारख, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, लोकमतचे सहायक शाखा व्यवस्थापक विनोद बुले, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर, लोकमतचे वितरक जितेंद्र चोरडिया आदी उपस्थित होते.
सदर दिंडीत शिवाजी महाराजांची वेशभुषा साकारलेला व घोड्यावर स्वार झालेला युवक लोकांचे लक्ष वेधून घेत होता. याशिवाय बाजीराव-मस्तानी यांची वेशभुषा साकारून युवांनी दिंडीत रंगत आणली. विशेष म्हणजे, वरोरा येथील चमूने आदिवासी वेशभुषा साकारून दिंडीत आदिवासी नृत्य सादर केले. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून सदर रॅलीचा जिल्हा क्रीडा संकुलात समारोप करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)