लोकमतचे उपक्रम बुद्धीला चालना देणारे
By Admin | Updated: December 27, 2015 01:25 IST2015-12-27T01:25:01+5:302015-12-27T01:25:01+5:30
उत्तम बातम्या, माहितीपूर्वक लेख यासोबतच विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे स्तंभ आणि त्यानुषंगाने

लोकमतचे उपक्रम बुद्धीला चालना देणारे
ए.एस. निखार : संस्काराचे मोती बक्षीस वाटप
बल्लारपूर : उत्तम बातम्या, माहितीपूर्वक लेख यासोबतच विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे स्तंभ आणि त्यानुषंगाने विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा असे विविधांगी कार्य लोकमतच्या माध्यमातून होत आहे. असे उपक्रम सातत्याने सुरू ठेवावे, असा आग्रह येथील सर्वोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.एस. निखार यांनी केला.
लोकमतच्या संस्काराचे मोती या स्पर्धेच्या पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर उपमुख्याध्यापक आर.पी. चन्ने, ज्येष्ठ शिक्षक एस.पी. खरतड यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत प्रथम राधा गजानन वडस्कर, द्वितीय मानसी राजकुमार सलामे व तृतीय पायल पी. टोंगे हे विजेते ठरलेत. त्यांना तसेच उत्तेजनपर दहा जणांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. चन्ने, खरतड यांचीही भाषणे झाली. संचालन एम.एम. मेश्राम तर आभार के.के. किरपाल यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)