लोकमततर्फे २० ला ‘टॅलेन्ट सर्च २०१५’ परीक्षा
By Admin | Updated: December 19, 2015 00:53 IST2015-12-19T00:53:06+5:302015-12-19T00:53:06+5:30
बालमनाचा सच्चा सवंगडी असलेल्या लोकमत बाल विकास मंचतर्फे विद्यार्थ्यांमधील सुप्तकला गुण बाहेर काढून त्यांना स्मार्ट बनविण्यासाठी दरवर्षी नव-नवीन उपक्रम राबवीत असतो.

लोकमततर्फे २० ला ‘टॅलेन्ट सर्च २०१५’ परीक्षा
सहभागी होण्याचे आवाहन : विजेत्यांना लाखोंची शिष्यवृत्ती
चंद्रपूर : बालमनाचा सच्चा सवंगडी असलेल्या लोकमत बाल विकास मंचतर्फे विद्यार्थ्यांमधील सुप्तकला गुण बाहेर काढून त्यांना स्मार्ट बनविण्यासाठी दरवर्षी नव-नवीन उपक्रम राबवीत असतो. या उपक्रमार्तंगत यावर्षी ‘टॅलेन्ट सर्च २०१५’ ही परीक्षा पेस आयआयटी अॅन्ड मेडिकल नागपूर व लोकमतच्या माध्यमातून २० डिसेंबर २०१५ ला सकाळी ९.३० वाजता सेंट फ्रॉन्सिस टी. एस. के. हायस्कूल दानववाडी बिनबा वार्ड चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे.
ही परीक्षा नि:शुल्क असून यामध्ये वर्ग आठवी, नववी तसेच दहावीतील सीबीएसई, आयसीएसई व स्टेट बोर्डचे सर्व विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. उर्त्तीण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व करोडो रुपयांची शिष्यवृत्ती पेस आणि लोकमतच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी कोणतीही संधी न दवडता या परीक्षेला बसून स्वत:मधील टॅलेन्ट सर्च करावे. परीक्षा त्यांच्याच वर्गातील अभ्यासक्रमावर आधारित असून यासाठी दीड तासांचा वेळ असून निगेटीव्ह मार्किंग ठेवण्यात आली आहे. प्रत्येक इच्छुक विद्यार्थ्यांनी स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालय धनराज प्लाझा मेन रोड चंद्रपूर येथे येऊन बाल विकास मंच व युवा नेक्स्टचे जिल्हा संयोजक सूरज गुरनुले (९५४५१९८७५२) व सखी मंचच्या जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे (९०११३२२६७४) यांच्याशी संपर्क साधावा. परीक्षा १० वाजता सुरू होणार असून सर्वांनी शाळेच्या ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)