लोकमत सखी मंच महाराष्ट्रातील महिलांचे बलाढ्य व्यासपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2016 03:39 IST2016-01-04T03:39:08+5:302016-01-04T03:39:08+5:30
याप्रसंगी राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, अॅड. मुर्लीधरराव धोटे, जिल्हा परिषद सदस्य

लोकमत सखी मंच महाराष्ट्रातील महिलांचे बलाढ्य व्यासपीठ
याप्रसंगी राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, अॅड. मुर्लीधरराव धोटे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, नगरपरिषद राजुराचे माजी उपाध्यक्ष अरुण मस्की, महाराष्ट्र लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी, चंद्रपूर जिल्हा लोकमतचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक विनोद बुले, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधाकर कुंदोजवार, जसविंदरसिंग धोतरा, मसुद अहमद, राजु घरोटे, शिवाजी महाविद्यालय राजुराचे प्राचार्य दौलतराव भोंगळे, नागपूरचे महेश भगतकर, चंद्रपूर लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे, डीआयडी सुपर मॉम लावणी सम्राज्ञी शिवानी सावदेकर, संमोहन तज्ज्ञ प्रा. एच.पी. डोर्लीकर, आनंद भेंडे, राजुरा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष बंडू माणुसमारे उपस्थित होते.
प्रास्तविक आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे कोषाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले. संचालन लोकमत सखी मंच राजुराच्या शहर संयोजिका कृतिका सोनटक्के व मालू राऊत यांनी केले. आभार प्रा. बी.यू. बोर्डेवार यांनी मानले.
लोकमत सखी महोत्सव सलग १२ तास रंगला. यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. फॅन्सी ड्रेस स्पर्धा : प्रथम- अंजली सावरकर (बल्लारपूर), द्वितीय- अॅड. मेघा धोटे (राजुरा), तृतीय- विणा देशकर (राजुरा), समुह नृत्य स्पर्धा : प्रथम- लोकमत सखी मंच बल्लारपूर, द्वितीय- लोकमत सखी मंच राजुरा, स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा :प्रथम- भारती झाडे (गडचांदूर), द्वितीय- वैशाली पुरी (बल्लारपूर), एकलनृत्य स्पर्धा : प्रथम- गंधर्व लांडगे (भद्रावती), द्वितीय- माधवी कटकु (राजुरा), तृतीय - संगीता बावणे (राजुरा), फॅशन शो: प्रथम- निर्मला विरूटकर (राजुरा), द्वितीय-प्रियंका माने (बल्लारपूर), तृतिय- विभल खान (राजुरा), डम शो : नेहा जोशी, पूजा ठाकरे, प्रा. मंगला नाकोडे, प्रा. सुनीता जमदाडे, प्रा. कविता कवठे, भारती झाडे, नैना गेडाम. या संपुर्ण स्पर्धांचे परीक्षण शीतल उपगन्लावार, स्वाती गादेवार, अल्का सदावर्ते, प्रा. मंगला माकोडे यांनी केले. सर्व स्पर्धांचे संचालन कृतिका सोनटक्के, ज्योती जावरे, स्मिता येरावार, सुप्रिया पोशट्टीवार, शुभांगी वाटेकर, शिला बेलखेडे, सुनिता लवने, मालू राऊत, प्रा. सुनिता जमदाडे, विभल खान, उषा बोबडे, नैना गेडाम यांनी केले. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा राजुराचे तहसिलदार धर्मेश फुसाटे, लोकमतचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक विनोद बुले, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी अरुण सहाय, पूजा ठाकरे, आनंद भेंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. सखी मंचच्या महाराष्ट्राच्या संयोजिका नेहा जोशी यांच्या हस्ते सखी संयोजिका किरण दुधे (बल्लारपूर), राजुरा कृतिका सोनटक्के, संध्या पत्तेवार, रिता पाटील यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. याप्रसंगी लोकमतच्या वतीने केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार अॅड. संजय धोटे, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आला.
शनिवारी रात्री डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचा ‘मिर्झा’ एक्स्प्रेस या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी राजरत्न बन्सोड यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल हजारे, विरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक मेडपल्लीवार, प्राचार्य दौलतराव भोंगळे, बंडू माणुसमारे उपस्थित होते. आनंद मेळाव्याचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, राजुरा तालुका शिवसेना प्रमुख नितीन पिपरे, जेष्ठ व्यापारी सतिश धोटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रा. विठ्ठल आत्राम लिखित ‘घरच्यातील चारोळ्या’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
(शहर प्रतिनिधी)