लोकमत सखी मंच एकदिवसीय नोंदणीचा लकी ड्रा जाहीर

By Admin | Updated: March 16, 2017 00:45 IST2017-03-16T00:45:03+5:302017-03-16T00:45:03+5:30

लोकमत सखी मंच २०१७ च्या चंद्रपूर येथील एकदिवसीय सदस्य नोंदणीचा लकी ड्रा शनिवारला जाहीर करण्यात आला.

Lokmat Sakhi Forum announces lucky draw of one-day registration | लोकमत सखी मंच एकदिवसीय नोंदणीचा लकी ड्रा जाहीर

लोकमत सखी मंच एकदिवसीय नोंदणीचा लकी ड्रा जाहीर

विजेत्यांना मिळाली पैठणीसह आकर्षक बक्षिसे
चंद्रपूर: लोकमत सखी मंच २०१७ च्या चंद्रपूर येथील एकदिवसीय सदस्य नोंदणीचा लकी ड्रा शनिवारला जाहीर करण्यात आला. यामध्ये स्वाती गजानन कापूरवार, योगीता कुंटेवार, कांती दहीवडे या पैठनीच्या मानकरी ठरल्या. तर सुनिता गेडाम, संध्या गर्गेलवार, माया सावरकर, वंदना मुनघाटे यांच्यासह १०७७०९ या क्रमांकाच्या सखीने ट्रॉली बॅग पटकावली आहे.
नवीन सत्रातील लोकमत सखी मंच सदस्य नोंदणीला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसेंदिवस लोकमत सखी मंचाच्या व्यासपीठाची उंची वाढतच असून महिलांचा उत्साहसुद्धा दरवर्षी वाढताना दिसत आहे. हाच उत्साह द्विगुणीत करण्याकरिता तसेच सखींना प्रोत्साहित करण्याकरिता या लकी ड्रा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खंडेलवाल सारीज अ‍ॅन्ड ज्वेलर्स तर्फे विजेत्यांना आकर्षक पैठनी देण्यात आल्या. तर एस. के. आॅईल इंडस्ट्रीजतर्फे आकर्षक ट्रॉली बॅग देण्यात आल्या. सोबतच पूजा कलेक्शनतर्फे २५ आकर्षक गिफ्ट हॅम्पर देण्यात आले.
यावेळी महिला दिनानिमित्त सखींसाठी ‘वॉट्सअ‍ॅप मसाला’ स्पर्धाही घेण्यात आली. त्यात प्रथम क्रमांक बिंदीया वैद्य, तर द्वितीय स्वाती कुंभारे यांनी पटकावला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खंडेलवाल ज्वेलर्सचे श्रीधर सामल आणि विशाल आकोजवार, आहार तज्ज्ञ डॉ. भारती दुधानी, पूजा कलेक्शनच्या संचालिका स्वाती तायडे, लोकमत चंद्रपूरचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक विनोद बुले उपस्थित होते. यावेळी रघुकूल होम अप्लायंसेसचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमात प्रथम येणाऱ्या १०० सखींसाठी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये वैशाली पिल्लेवार आणि सीमा वनकर विजयी ठरल्या. लकी ड्रॉचे विजेते स्पर्धक खालील प्रमाणे असून अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे ९०११३२२६७४ यांच्याशी संपर्क साधावा. कीर्ती देऊरकर, मनिषा आंबेकर, पार्वती लभाने, स्वाती लखपती, जान्हवी मैंदळकर, अर्चना पोटदुखे, सारीका गोन्नाडे, संजना तुगीडवार, अश्विनी बोरकर, कविता जावळे, संगीता कुर्वे, प्रियदर्शनी पोहणे, माला रामदास झाडे, सविता दर्वे, पूजा पडोळे, चंदा केवे, सोनाली येगीनवार, अंजना मंडल, मिना तुमसरे, रेखा बोबांटे, प्रांजली फरकाडे, निलीमा पोरेकर या सखी लकी ड्राच्या विजेत्या ठरल्या आहेत. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Lokmat Sakhi Forum announces lucky draw of one-day registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.