लोकमत राजुरा ‘शिवार’ पुरवणीचे आज प्रकाशन
By Admin | Updated: March 16, 2016 08:35 IST2016-03-16T08:35:29+5:302016-03-16T08:35:29+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘लोकमत राजुरा शिवार’ या विशेष पुरवणीचा प्रकाशन समारंभ बुधवारी १६ मार्चला सायंकाळी ४ वाजता होत आहे.

लोकमत राजुरा ‘शिवार’ पुरवणीचे आज प्रकाशन
सखी मंचचा मेळावा : सदस्य नोंदणी केलेल्या सखींना कूपन वाटप
राजुरा : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘लोकमत राजुरा शिवार’ या विशेष पुरवणीचा प्रकाशन समारंभ बुधवारी १६ मार्चला सायंकाळी ४ वाजता होत आहे. स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात हा समारंभ होणार असून या निमित्ताने लोकमत सखी मंच सदस्यांचा मेळावाही आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर राहणार असून पुरवणीचे प्रकाशन माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते होईल. मुख्य अतिथी म्हणून राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे, माजी आमदार अॅड. वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, नगर परिषद राजुराचे अध्यक्ष मंगला आत्राम, उपाध्यक्ष अरुण धोटे, उपविभागीय अधिकारी शंतनू गोयल, तहसेलदार धर्मेश फुसाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजरत्न बन्सोड, राजुराचे ठाणेदार, प्रमोद डोंगरे, नगर परिषद राजुराचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, वनपरिक्षेत्र अधिारी सुनील हजारे, ग्रामीण रुग्णालय राजुराचे अधीक्षक डॉ.लहू कुळमेथे, पंचायत समिती सभापती निर्मला कुळमेथे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिदास बोबडे, राजुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार, माजी अध्यक्ष बंडू माणुसमारे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, नानाजी आदे, पंचायत समिती सदस्य अब्दुल जमीर, प्राचार्य दौलतराव भोंगळे, गटनेते स्वामी येरोलवार, प्रा. अनिल ठाकुरवार, प्रा. सत्यपाल कातकर, राजुरा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सुनील देशपांडे, ज्येष्ठ व्यापारी समिती धोटे, भाजपाचे जिल्हा महासचिव अरुण मस्की, सदाराव सोळंकी, राजेंद्र डोहे, भाजयुमोचे सचिन डोहे, सिद्धार्थ बगडे, नगरसेवक सय्यद सखावत अली, ज्येष्ठ नागरिक संघाचे डॉ. सुरेश उपगन्लावार, शिवाजी विद्यालय राजुराचे मुख्याध्यापक पी.एस. उराडे उपस्थित राहतील.
याप्रसंगी लोकमत राजुरा तालुका शिवार पुरवणीचे विमोचन, लोकमत सखी मंचच्या सर्व सदस्यांना सिल्वर कोटेड कुयरी कूपन वितरण तसेच विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी राजुरा तालुक्यातील सखी मंच सदस्य, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकार, लोकमत, लोकमत समाचार वाचक, एजन्ट, वार्ताहर, सखी मंच सदस्यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती लोकमतचे तालुका प्रतिनिधी आनंद भेंडे, शहर प्रतिनिधी प्रा. बी. यू. बोर्डेवार, सखी मंच संयोजिका जयश्री देशपांडे, कृतिका सोनटक्के, संध्या पत्तेवार, वार्ताहर शाहू नारनवरे, शंकर मडावी, प्रकाश काळे, मनोज मून, विजय चन्ने, प्रवीण मेकर्तीवार, गौतम रत्ने, युवा नेक्स्टचे अविनाश दोरखंडे, छोटू सोमलकर आदींनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)