लोकमान्य भद्रावतीचा मुलींचा क्रिकेट संघ राज्यस्तरावर
By Admin | Updated: October 24, 2016 01:01 IST2016-10-24T01:01:36+5:302016-10-24T01:01:36+5:30
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडूवर चंद्रपूर जिल्ह्याने नागपूर मनपा क्रिकेट संघावर मात करीत विभागीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविले.

लोकमान्य भद्रावतीचा मुलींचा क्रिकेट संघ राज्यस्तरावर
अहमदनगर येथे होणार स्पर्धा : संस्थेतर्फे खेळाडूंचा सत्कार
भद्रावती : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडूवर चंद्रपूर जिल्ह्याने नागपूर मनपा क्रिकेट संघावर मात करीत विभागीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविले.
गोंदिया येथील जिल्हा क्रीडा कार्यालयाने १९ वर्षांखालील शालेय मुलींच्या विभागीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भद्रावतीच्या लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने चंद्रपूर जिल्हा ग्रामीण संघाचे नेतृत्व केले. अहमदनगर येथे खेळल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ नागपूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे, या संघाला प्रा.सचिन सरपटवार तसेच प्रा.स्वाती गुंडावार यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी संघाचे लोकसेवा मंडळ भद्रावतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार शाळा समिती अध्यक्ष विकास उपगन्लावार प्राचार्य रेखा पबितवार, उपप्राचार्य गोपाल ठेंगणे, पर्यवेक्षक अविनाश पाम्पट्टीवार पर्यवेक्षक पांडुरंग बदकी, प्रा. विलास बोनगिरवार, क्रीडाप्रमुख देविदास जांभुळे, बंडू दरेकर, रूपचंद धारणे उपस्थित होते. अंतिम सामना चंद्रपूर जिल्हा व नागपूर मनपा सघ यांच्या झाला. चंद्रपूर जिल्ह्याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण पत्करले. नागपूर मनपाने संघाने ३९ धावा केल्या. चंद्रपूर जिल्ह्याने अगदी शेवटच्या चेंडूवर धाव घेत विजय प्राप्त केला. विजयी संघात जयश्री मडावी (कर्णधार), दीक्षा देवगडे, संजिवनी कावळे, अंजली गाडगे, नयन कोरडे, ज्ञानदीपा मडावी, सायली झाडे, तन्वी तुरारे, केतकी गंडाईत, स्विटी मुसळे, साक्षी मेंढे, रेणुका लांडे, राजश्री गुरनुले, भाग्यश्री खिराळे या खेळाडूंचा सहभाग होता. (तालुका प्रतिनिधी)