शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; असे चालते ईव्हीएमचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 11:54 IST

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही व्यवस्थेचा देश आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन) ची आहे.

ठळक मुद्देमतदारांमध्ये कुतूहल कायम निवडणुका म्हणजे लोकशाहीचा जणू उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही व्यवस्थेचा देश आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन) ची आहे. परंतु, याबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रम व कुतूहलाचे वातावरण आहे. त्यामुळे मशीनचे स्वरूप समजून घेणे गरजेचे आहे.

-ईव्हीएममध्ये सर्वाधिक किती मते नोंदली जाऊ शकतात?ईव्हीएममध्ये कमाल ३,८४० मते नोंदली जाऊ शकतात. एका मतदान केंद्रावर १५०० हून कमी मतदारांची संख्या असते.

- वीज पुरवठा नसलेल्या भागात ईव्हीएम कसे वापरले जाते?ईव्हीएम विद्युत पुरवठ्यावर अवलंबून नसते. ते अल्कलाईन बॅटरीवर चालते.

- ईव्हीएममध्ये किती उमेदवार सामावू शकतात?उमेदवारांची संख्या ६४ पर्यंत असल्यास ईव्हीएमद्वारे निवडणुका घेता येतात.

- उमेदवारांची संख्या ६४ हून अधिक झाल्यास काय होते?अशा प्रकरणात पारंपरिक मतपत्रिका व मतपेट्यांच्या पद्धतीनुसार निवडणुका घेतल्या जातात.

- मतपत्रिकांऐवजी ईव्हीएम आणण्याची गरज का पडली?मतमोजणी करण्यासाठी लागणारा प्रदीर्घ काळ तसेच कधीकधी दोन दिग्गज उमेदवारांच्या मतांमध्ये कमी फरक आढळल्यास फेर मतमोजणी करण्याच्या मागणीमुळे ही परिस्थिती आणखी कठीण होत असे. देशात ईव्हीएमची निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड व इलेक्ट्रॉनिक्स कॉपोरेशन आॅफ इंडिया लिमिटेडकडून केली जाते.

- भारताव्यतिरिक्त ईव्हीएम कोणत्या देशात वापरले जाते?नेपाळ व भूतानमध्ये ईव्हीएम वापरले जाते.

-देशात ईव्हीएम प्रथम कुठे वापरली गेली?१९८२ रोजी केरळ राज्यातील परुर विधानसभा मतदारसंघात ५० जागांवर यंत्र वापरले.

- ईव्हीएमचे फायदे कोणते?अवैध व शंकास्पद मते टाळता येतात. मतमोजणी जलद होते. एकच मतपत्रिका आवश्यक असल्यामुळे छपाई खर्चात बचत होते.

- ईव्हीएम सीलबंद करण्याची काय पद्धत आहे? असे का केले जाते? हे कसे केले जाते?ईव्हीएमल संपूर्णपणे वेष्टनात गुंडाळले जाते. जेणेकरून त्याच्या बटणांना कुणालाही हात लावता येणार नाही. त्यावरील रिझल्ट सेक्शनलाही सीलबंद केले जाते. मतमोजणीआधी कुणालाही निकाल कळत नाही. सीलवर मतदान अधिकाऱ्यांच्या सीलबरोबरच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची सही घेतले जाते.

- मतदानानंतर मतमोजणीपर्यंत ईव्हीएम कुठे ठेवली जातात?मतदानानंतर सुरक्षित ठिकाणी मतदान यंत्र ठेवली जातात. जवळपासच्या ठिकाणी जिथे उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत देखरेख ठेऊ शकतो. बहुतेकदा ही यंत्र मतमोजणीच्याच ठिकाणी ठेवली जातात.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक