लॉकडाऊन लावला; पण खासगी बचतगटांचे कर्ज फेडायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:28 IST2021-05-08T04:28:56+5:302021-05-08T04:28:56+5:30

घोडपेठ : भद्रावती तसेच तालुक्यातील नव्वद टक्के महिला खासगी बचतगटांच्या कर्जदार आहेत. सरकारने लॉकडाऊन लावल्यामुळे सर्व कामधंदे ठप्प झाले ...

Lockdown imposed; But how to repay the loans of private savings groups? | लॉकडाऊन लावला; पण खासगी बचतगटांचे कर्ज फेडायचे कसे?

लॉकडाऊन लावला; पण खासगी बचतगटांचे कर्ज फेडायचे कसे?

घोडपेठ : भद्रावती तसेच तालुक्यातील नव्वद टक्के महिला खासगी बचतगटांच्या कर्जदार आहेत. सरकारने लॉकडाऊन लावल्यामुळे सर्व कामधंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे खासगी बचतगटांचे कर्ज सरसकट माफ करावे, अशी मागणी भद्रावती येथील सामाजिक कार्यकर्त्या आम्रपाली गेडेकर यांनी केली आहे.

मध्यमवर्गीय तसेच गरीब कुटुंबांना सोयीचे व्हावे म्हणून खासगी बचतगटांमार्फत महिलांना १५ ते २० हजार रुपयांपर्यंत अल्पमुदतीचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. प्रत्येक गावागावात तसेच भद्रावती शहरातील प्रत्येक वॉर्डात महिलांनी खासगी बचतगटाचे कर्ज उचललेले आहे. कोरोनाच्या आधीपर्यंत महिलांचा सर्व व्यवहार सुरळीत सुरू होता. मात्र, कोरोना व लॉकडाऊनमुळे तालुक्यातील नागरिकांना रोजचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. त्यातच कर्जाचे हफ्ते भरावे लागत आहेत. त्यामुळे सर्व कुटुंबच चिंतेत सापडले आहे.

भद्रावती शहर व तालुक्यात उत्कर्ष स्मॉल फायनान्स वणी, इसाफ फायनान्स, आरबीएल - सबके फायनान्स, ग्रामीण कोटा, ग्रामशक्ती व इतर खाजगी कंपन्यांनी महिलांना कर्ज वाटप केलेले आहे. या खाजगी कंपन्यांपैकी काही कंपन्यांचे प्रतिनिधी महिलांशी समजूतदारपणे वागतात. मात्र, बरेच प्रतिनिधी या महामारीचा फायदा घेत महिलांना पैशासाठी धारेवर धरत आहेत. बऱ्याच महिलांना अपमानास्पद वागणूक दिल्या जात आहे. त्यामुळे पैशांअभावी कर्जदार महिला आत्महत्या करण्याची शक्यताही निर्माण झालेली आहे.

लॉकडाऊनच्या आधीपर्यंत व नंतरही कर्जदार महिलांनी या खाजगी बचतगटांचे हफ्ते वेळेवर फेडलेले आहेत. मात्र, मागील वर्षीपासून कमी- अधिक प्रमाणात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आता मात्र नागरिकांना चिंतेच्या विवंचनेत टाकले आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरायचे कसे, हा प्रश्न तालुक्यातील महिलांना भेडसावत आहे.

कोट

सरकारने लावलेल्या लॉकडाऊनला आमचे समर्थनच आहे. मात्र, खाजगी बचतगटांचे महिलांचे कर्ज सरकारने सरसकट माफ करावे. अन्यथा परिस्थिती ठीक होईपर्यंत कर्जाचे हफ्ते समोर ढकलण्यात यावेत.

- आम्रपाली गौतम गेडेकर, सामाजिक कार्यकर्त्या, भद्रावती.

Web Title: Lockdown imposed; But how to repay the loans of private savings groups?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.