‘लॉकडाऊन‘मध्ये जि. प. शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:01:10+5:30

विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी मार्गदर्शक चित्रे, शैक्षणिक अभ्यासक्रमातील विविध विषयांचे चित्राच्या माध्यमातून भिंतीवर रेखाटन केले आहे. या चित्रांमुळे शाळा व परिसरातील भिंती बोलक्या झाल्या आहे. शाळा सुरू झाल्यानंतर या बोलक्या भिंतीतून ज्ञान मिळणार आहे.

In ‘Lockdown’, Dist. ZP School Talk wall | ‘लॉकडाऊन‘मध्ये जि. प. शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या

‘लॉकडाऊन‘मध्ये जि. प. शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या

Next
ठळक मुद्देसीईओंचे प्रोत्साहन : शिक्षकांकडून सुट्यांचा सदुपयोग

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊन कालावधीत जि. प. शाळांना सुट्टी असल्याने शिक्षकांनी ई लर्निंग कंटेंट, उत्तरपत्रिकांची तपासणी व निकालपत्र संबंधित कामकाजाकरिता उपस्थित राहताना कलावंताच्या सहकार्याने शाळांच्या भिंती विविध चित्रांद्वारे बोलक्या केल्या आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे व शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी मार्गदर्शक चित्रे, शैक्षणिक अभ्यासक्रमातील विविध विषयांचे चित्राच्या माध्यमातून भिंतीवर रेखाटन केले आहे. या चित्रांमुळे शाळा व परिसरातील भिंती बोलक्या झाल्या आहे. शाळा सुरू झाल्यानंतर या बोलक्या भिंतीतून ज्ञान मिळणार आहे.
चंद्रपूर तालुक्यातील चिंचाळा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने उल्लेखनीय कार्य केले. मे व जून महिन्यात शाळा आकर्षक केल्या. सरपंच डॉ. शरद रणदीवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दुर्योधन वाघमारे, गट शिक्षणाधिकारी समाधान भसारकर, शिक्षण विस्तार अधिकारी धनराज आवारी, केंद्रप्रमुख रत्नमाला खोब्रागडे यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक नामदेव आस्वले व शिक्षकांच्या मार्गदर्शनातून गणेश आर्ट चंद्र्रपूर, क्षितीज शिवकर भद्रावती, विनोद ठमके भद्रावती या चित्रकारांनी शाळेतील भिंतीचा कायापालट केला आहे.

आनंददायी शिक्षणाची गोडी
सावली तालुक्यातील करगाव केंद्र्र पाथरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनेही सरपंच धनराज लांडगे, शाळा समितीचे अध्यक्ष शरद नागापूरे, गट शिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, केंद्रप्रमुख प्रमोद नान्हे यांच्या सहकार्याने भिंती बोलक्या केल्या आहेत. मुख्याध्यापक बी.एम. मेश्राम, ए. एम मानकर, टी.डी नैताम यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाची गोडी लावण्यासाठी ही चित्रे प्रेरणादायी ठरणार आहेत.

Web Title: In ‘Lockdown’, Dist. ZP School Talk wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.