मराठा व ब्राह्मण समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:26 IST2021-03-24T04:26:24+5:302021-03-24T04:26:24+5:30

मराठा, ब्राह्मण समाजातील बेरोजगार युवक, युवतींना आर्थिक मदतीचा हात देत, स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी राज्य शासनाने ही योजना सुरू ...

Loan scheme for youth from Maratha and Brahmin communities | मराठा व ब्राह्मण समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज योजना

मराठा व ब्राह्मण समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज योजना

मराठा, ब्राह्मण समाजातील बेरोजगार युवक, युवतींना आर्थिक मदतीचा हात देत, स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत एक हजार ९०० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. २३ हजार १५० लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या संदर्भात लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी असून, मोठ्या संख्येने जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक अमरीन पठान यांनी केले आहे. कर्ज योजनेचा लाभ कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रम, तसेच लघू मध्यम उद्योगासाठी घेण्यात यावा, उत्पादन, व्यापार, विक्री, सेवा या क्षेत्रासाठीही या योजनेतून कर्ज उपलब्ध केल्या जाते. पुरुषासाठी १८ वर्षांपासून ५० वयोगटांपर्यंत तर महिलांसाठी १८ ते ५५ असे वयोगट निश्चित करण्यात आले असून, यातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, योजना गट व कर्ज व्याज परतावा योजना अशा दोन विभागांतर्गत कर्ज देण्याची सोय करण्यात आली आहे. योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने केली आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य ‍विकास कार्यालय प्रशासकीय भवन, पहिला मजला, येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त भै.गो. येरमे यांनी केले आहे.

Web Title: Loan scheme for youth from Maratha and Brahmin communities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.