लॉयड मेटलच्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन
By Admin | Updated: May 13, 2017 00:28 IST2017-05-13T00:28:41+5:302017-05-13T00:28:41+5:30
येथील लॉयड मेटलमधील भारतीय लॉयड कामगार संघटनेच्या नेतृत्वात वेतनवाढीचा एरिअस मिळावा,

लॉयड मेटलच्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : येथील लॉयड मेटलमधील भारतीय लॉयड कामगार संघटनेच्या नेतृत्वात वेतनवाढीचा एरिअस मिळावा, या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी दोन तास ठेकेदारी कामगारांनी आंदोलन केले.
वेतनवाढीच्या एरिअस नियमानुसार रक्कम मिळावा, यासाठी दोन दिवसांपूर्वी ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर परत टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वीही कामगारांनी आपल्या मागण्याबाबत व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे.