जनावरांची कोंबून वाहतूक; ट्रक जप्त
By Admin | Updated: July 11, 2017 00:27 IST2017-07-11T00:27:34+5:302017-07-11T00:27:34+5:30
दहा जनावरांना निर्दयीपणे कोंबून ट्रकने वाहतूक करीत असल्याची माहिती प्राप्त होताच कहाली टी-पार्इंट जवळ ट्रक अडवून १० जनावरांसह ट्रक जप्त करण्यात आला.

जनावरांची कोंबून वाहतूक; ट्रक जप्त
१० जनावरे पकडली : कहाली टी-पॉर्इंटजवळील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : दहा जनावरांना निर्दयीपणे कोंबून ट्रकने वाहतूक करीत असल्याची माहिती प्राप्त होताच कहाली टी-पार्इंट जवळ ट्रक अडवून १० जनावरांसह ट्रक जप्त करण्यात आला. मात्र ट्रक चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. ही कारवाई ब्रह्मपुरी पोलिसांनी सोमवारी केली.
अवैध प्रवासी वाहतूक मोहीम कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना कहाली टी-पार्इंट वरुन तोरगाव मार्गे १० जनावरे ट्रकमध्ये कोंबून नेत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा ट्रक अडवून झडती घेण्यात आली. एमएच ३४ एजी २८३८ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये दोन बैल, दोन गाई, सहा लहान गोरे असे १० जनावरे कोंबून नेत असल्याचे निर्दशनास आले. या कारवाई दरम्यान ट्रक चालकाने पळ काढला.
ट्रक जप्त करण्यात आला असून ब्रह्मपुरी पोलिसांत चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पंचनामा केला असता, जनावरांची किंमत १ लाख ५ हजार रुपये व ट्रकची किंमत पाच लाख असे असा ६ लाख ५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरार आरोपी विरुद्ध कलम ५, ५ (अ), ५ (ब.) प्राणि अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व जनावरांना
गोशाळेत सोडले
पकडण्यात आलेल्या जनावरांना हळदा येथील गो-शाळेत सोडण्यात आले आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून ट्रक पकडल्याने जनावरांची सुटका झाली.