विद्यार्थ्यांनी दिले जखमी घुबडाला जीवनदान

By Admin | Updated: August 22, 2015 01:37 IST2015-08-22T01:37:19+5:302015-08-22T01:37:19+5:30

कोरपना येथील जि.प. प्राथमिक शाळा परिसरात एक घुबड पक्ष्याला शालेय विद्यार्थ्यांनी जीवनदान दिल्याची घटना बुधवारी घडली.

Lives of the injured owl given by students | विद्यार्थ्यांनी दिले जखमी घुबडाला जीवनदान

विद्यार्थ्यांनी दिले जखमी घुबडाला जीवनदान

चंद्रपूर: कोरपना येथील जि.प. प्राथमिक शाळा परिसरात एक घुबड पक्ष्याला शालेय विद्यार्थ्यांनी जीवनदान दिल्याची घटना बुधवारी घडली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
हेटी येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात मधल्या सुट्टीत विद्यार्थी खेळत होते. खेळता-खेळता काही विद्यार्थ्यांचे लक्ष जखमी अवस्थेत असलेल्या एका घुबड पक्ष्याकडे गेले. त्या विद्यार्थ्यांनी लगेच याबाबत मुख्याध्यापक अरुण उमरे, भाऊराव पंधरे, मधुकर बनकर, सुरेखा बनकर, चिंतामण पवार, भास्कर रागीट यांना माहिती दिली. या सर्वांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी घुबडाकडे धाव घेतली. यावेळी घुबडाचे पंख तुटल्याचे आढळून आले.
घुबडाला ताततडीने ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला पाणी पाजण्यात आले. काही वेळातच त्याच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली. त्यानंतर त्याला उडविण्यात आले. मुख्याध्यापक अरुण उमरे यांनी नंतर विद्यार्थ्यांना घुबडाचे महत्व विद्यार्थ्याना पटवून दिले.
आपण एका घुबड पक्ष्याचे प्राण वाचविल्याचा आनंद शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. विद्यार्थ्यांच्या समय सूचकतेमुळेच जखमी घुबडाला जीवनदान मिळाले. त्यामुळे गावकऱ्यांनीदेखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)

Web Title: Lives of the injured owl given by students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.