लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दुर्गापूर शहरात दुपारी एका हत्येची घटना ताजी असतानाच रात्री काळजाचा थरकाप उडवणारी खुनाची आणखी एक घटना उघडकीस आली. ७ वर्षांनी मोठ्या असलेल्या आपल्या प्रेयसीची मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून करून प्रेयसीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र, वैद्यकीय अहवालाने त्याचा हा बनाव उघडकीस आला. शेवटी पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या. अंकेश योगेश बहीरवार (२२, रा. सोनापूर, ता. सावली) असे आरोपी प्रियकराचे नाव असून, प्रियंका वांढरे (वय २९, रा. तुकूम) असे मृत प्रेयसीचे नाव आहे.
प्रियंका पतीपासून विभक्त राहत होती. याचदरम्यान तिची ओळख ७ वर्षांनी लहान असलेल्या अंकेशशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघेही प्रियंकाच्या घरीच वरच्या मजल्यावर लिव्ह-इनमध्ये राहू लागले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद होत होते.
शवविच्छेदनातून फुटले बिंग
१४ मार्च २०२६ च्या रात्री अंकेशने प्रियंकाच्या वडिलांना फोन करून प्रियंका बोलत नाहीये, तिने मान टाकली आहे असे सांगून घाबरविण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी आलेल्या शवविच्छेदन अहवालाने चित्र पालटले. प्रियंकाचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी अंकेशला ताब्यात घेतले.
Web Summary : In Chandrapur, a man killed his live-in girlfriend with a phone charger wire, staging it as suicide. The post-mortem revealed strangulation, leading to his arrest. Arguments were frequent between the couple living in a live-in relationship.
Web Summary : चंद्रपुर में, एक व्यक्ति ने अपनी लिव-इन गर्लफ्रेंड की मोबाइल चार्जर के तार से गला घोंटकर हत्या कर दी और आत्महत्या का नाटक किया। पोस्टमार्टम से गला घोंटने का पता चला, जिसके बाद उसे गिरफ्तार कर लिया गया। लिव-इन में रहने वाले जोड़े के बीच अक्सर झगड़े होते थे।