शिक्षकांच्या आतंरजिल्हा बदलीची यादी संकेतस्थळावर
By Admin | Updated: June 18, 2017 00:36 IST2017-06-18T00:36:56+5:302017-06-18T00:36:56+5:30
जिल्ह्यातील ज्या शिक्षकांनी आंतर बदलीसाठी अर्ज केलेले होते, अशा शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली संदर्भातील शिक्षकांची यादी शासनाकडून शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे.

शिक्षकांच्या आतंरजिल्हा बदलीची यादी संकेतस्थळावर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील ज्या शिक्षकांनी आंतर बदलीसाठी अर्ज केलेले होते, अशा शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली संदर्भातील शिक्षकांची यादी शासनाकडून शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. ही यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती, स्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, असे असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद यांनी कळविले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी प्रतीक्षा लागून होती. आता प्रतीक्षा संपली आहे.