मातीचे ढिगारे उठले प्रकल्पग्रस्त गावांच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:22 IST2018-06-03T23:21:46+5:302018-06-03T23:22:03+5:30
कोळसा खननानंतर वेकोलिने टाकलेल्या मातीच्या महाकाय ढिगाऱ्याला नदी, नाल्यातील पाण्याचा प्रवाह अडून वेकोलि खाण परिसरातील शेकडो हेक्टर शेती पावसाळ्यात पाण्याखाली येते.

मातीचे ढिगारे उठले प्रकल्पग्रस्त गावांच्या जीवावर
प्रकाश काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : कोळसा खननानंतर वेकोलिने टाकलेल्या मातीच्या महाकाय ढिगाऱ्याला नदी, नाल्यातील पाण्याचा प्रवाह अडून वेकोलि खाण परिसरातील शेकडो हेक्टर शेती पावसाळ्यात पाण्याखाली येते. मागील आठवड्यात एका दिवसाच्या पावसाच्या पाण्याने नाल्यात टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला पाणी अडल्याने पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गेल्या २५ वर्षापासून वेकोलि प्रशासन प्रकल्पग्रस्त गावांवर अन्याय करीत असताना जबाबदार स्थानिक लोकप्रतिनिधींच्या ही बाब लक्षात का येत नाही, असा केविलवाणा प्रश्न आता प्रकल्पग्रस्त गावकरी विचारत आहे.
राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाºया वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्खनानंतर वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे नदी, नाल्याच्या अगदी किनाºयावर टाकले आहे तर कुठे वेकोलिने माती टाकून नाल्याचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाहच बंद केला. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मातीच्या ढिगाºयाला पाण्याचा प्रवाह अडून अनेकदा गोवरी, सास्ती व परिसरातील गावांना बॅक वॉटरचा फटका बसून क्षणार्धात पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने अकेक संसार उघडयावर आल्याचे प्रकल्पग्रस्त गावकºयांनी उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. मागील आठवड्यात आलेल्या एका दिवसाच्या पावसाने मातीच्या ढिगाºयाला पाण्याचा प्रवाह अडून पुरस्थिती निर्माण झाली होती. याबाबतचे वृत्तही लोकमतने प्रकाशित करुन वेकोलि प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वेकोलिने नैसर्गिक जिवंत नाले अपाल्या सोईनुसार वळविल्याने पावसाळ्यात पाणी गोवरी, सास्ती, पोवनी गावाच्या दिशेने लवकर फेकले जाते. त्यामुळे या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती क्षणार्धात पाण्याखाली येते. शेतीचे असे प्रचंड नुकसान होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी वेकोलिला जाब का विचारत नाही, हा येथील शेतकºयांचा सवाल आहे.
वेकोलिच्या कोळसा खाणी वर्धा नदी परिसरात वाटत चालल्याने गावकºयांना केव्हाही पुराचा मोठा होऊ शकतो. मात्र याकडे वेकोलिने मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले आहे. वेकोलिने वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा कमवायचा व गावकºयांनी वेकोलिचे दूष्परीणाम वर्षानुवर्ष सहन करीत राहायचे, असा येथील अलिखित नियमच बनला आहे. गावकºयांनी जीवन-मरणाचा हा संघर्ष कुठपर्यंत सहन करायचा, याचे उत्तर अजूनही कुणालाच शोधता आले नाही. ही खरी शोकांतिका आहे. वेकोलिने केलेल्या कर्माचे भोग वेकोलिच्या कुशीत वसलेल्या गावांना सहन करावे लागतात. गावकºयांची ही होरपळ आता सर्वांनाच सहन होत नाही. परंतु वेकोलिच्या मुजोर प्रशासनासमोर गावकरी हतबल आहे. गावकºयांनी अनेकदा निवेदन देऊन वेकोलिला उपाययोजना करण्यास सांगितले. मात्र वेकोलिच्या जबाबदार अधिकाºयांनी याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले.
नियमांना डावलून उभे केले मातीचे ढिगारे
पर्यावरणाला धोका होऊ नये म्हणून मातीचे ढिगारे कुठे व किती उंचावर असावे, याचे काही नियम वेकोलिला आखून दिले आहे. मात्र वेकोलि प्रशासनाने सर्रास नियमांना तिजांजली देत नदी, नाल्याचा अगदी काठावर मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहे. यामुळे जलवाहिनी समजला जाणाºया वर्धा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने वेकोलिने टाकलेले मातीचे ढीगारे घातक आहेत.
वेकोलिने टाकलेले मातीचे महाकाय ढिगारे वेकोलिच्या कुशित बसलेल्या प्रकल्पग्रस्त गावांसाठी अतिशय घातक आहे. पावसाळ्याच्या दिवसात बॅक वॉटरचा फटका बसून या गावांना पुराचा मोठा धोका होण्याची शक्यता आहे. वेकोलि प्रशासनाने याची तातडीने उपाययोजना न केल्यास प्रकल्पग्रस्त गावातील नागरिक वेकोलिविरोधात रस्त्यावर उतरल्यिाशिवाय राहणार नाही.
- भास्कर जुनघरी, नागरीक, गोवरी