शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

खाकीतील माणुसकीने दिले तरुणाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 1:02 AM

आर्थिक विवंचनेत असलेला जिवती तालुक्यातील पिटीगुड्डा येथील संजय पवार रविवारी चंद्रपुरात नोकरी शोधण्यासाठी आला. चंद्रपुरातील अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाने त्याला उष्माघाताचा झटका आला.

ठळक मुद्देआर्थिक विवंचना : कामाच्या शोधात जिवती तालुक्यातील युवक चंद्रपुरात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आर्थिक विवंचनेत असलेला जिवती तालुक्यातील पिटीगुड्डा येथील संजय पवार रविवारी चंद्रपुरात नोकरी शोधण्यासाठी आला. चंद्रपुरातील अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाने त्याला उष्माघाताचा झटका आला. मात्र, ठाणेदार पुंजारवाड यांच्या मदतीने त्याचा जीव वाचला आणि खाकीतील माणुसकीचा पुन्हा एकदा परिचय आला.संजय पवार दुपारच्या सुमारास चंद्रपुरात आला. काम शोधण्यासाठी वणवण भटकत असताना उन्हाच्या तडाख्याने त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्याकडे कानाडोळा केला. मात्र, पुन्हा तोच प्रकार त्यांच्यासोबत सुरु झाला.रस्ता निर्मनुष्य असल्याने मदतीसाठी कुणीही नव्हते. त्याला पिट्टीगुड्याचे ठाणेदार पुंजरवाड काही दिवसांपूर्वीच चंद्रपुरात रुजू झाल्याची माहिती होती. तो त्यांचे घर शोधत त्यांच्याकडे पोहोचला. ते घरी नव्हते. मात्र, त्यांच्या पत्नीला संजयची प्रकृती बरी नसल्याचे लक्षात आले. त्याला घरात बोलावून निंबू सरबत दिले. दरम्यानच्या काळात पुंजरवाड यांच्याशी दूरध्वीवरुन संपर्क साधला. ते किराणा सामान आणण्याकरिता बाहेर गेले होते. याची माहिती मिळताच ते लगेच घरी परतले.घरी आल्यानंतर त्यांनी संजयला ओळखले. त्याची विचारपूस सुरु असतानाच तो खाली कोसळला. त्यांनी संजयला उठविले आणि मोटारसायकलवर बसवून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला उष्माघाताचा झटका आल्याची माहिती दिली. त्याला त्वरित उपचारासाठी दाखल केले. कागदपत्रांची पूर्तता केली. दरम्यानच्या काळात त्यांनी पिट्टीगुडा येथे त्याच्या घरी निरोप पाठविला. मात्र, त्याची वृद्ध आईच घरी होती. पत्नी मजुरीसाठी बाहेर गेली होती, त्यामुळे तिथून कुणीच आले नाही. ते स्वत: रुग्णाजवळ दिवसभर थांबले. सायंकाळी डॉक्टरांनी त्याला सुट्टी दिली.त्याला घरी आणण्याची तयारी केली. मात्र, संजयला आपल्या घरी परत जायचे होते. तेव्हा पाटण येथील शासकीय वाहन कामानिमित्त चंद्रपुरात आल्याची माहिती त्यांना मिळाली. डॉक्टरांनी लिहून दिलेली सर्व औषधेसुद्धा त्याला घेऊन दिली.स्वप्न अपूर्णसंजय आर्थिक विवंचनेत आहे. नोकरीच्या शोधात तो चंद्रपुरात आला होता. मात्र, उष्माघाताचा त्याला झटका आला आणि नोकरी शोधण्याचे स्वप्न अपूर्ण ठेवूनच आल्यापावली त्याला परत जावे लागले.

टॅग्स :Policeपोलिस