बालिकेवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला आजीवन कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2015 01:27 IST2015-10-16T01:27:55+5:302015-10-16T01:27:55+5:30

संगीत शिकण्याकरिता आलेल्या ११ वर्षीय मुलीवर संगीत शिक्षकाने लैंगिक अत्याचर केला. या प्रकरणी त्याला न्यायाधिशांनी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली.

Life imprisonment of a teacher who abused child abuse | बालिकेवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला आजीवन कारावास

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला आजीवन कारावास

शिक्षा सुनावताच आली भोवळ : उपचारासाठी रुग्णालयात दाखल
वरोरा : संगीत शिकण्याकरिता आलेल्या ११ वर्षीय मुलीवर संगीत शिक्षकाने लैंगिक अत्याचर केला. या प्रकरणी त्याला न्यायाधिशांनी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षा ऐकताच आरोपी शिक्षकाला न्यायालयात भोवळ आल्याने त्याला तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भद्रावती शहरातील विजय श्रीराम ठाकरे (६६) हा विद्यार्थ्यांना संगीत कलेचे धडे देत होता. १८ एप्रिल २०१४ रोजी भद्रावती येथील ११ वर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे सदर शिक्षकाकडे संगीताचे धडे घेण्यास गेली असता, त्या शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मुलीने आपल्या आईला सांगताच, यासंदर्भात सदर शिक्षकाविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यामध्ये संगीत शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.तक्रारीवरुन भद्रावती पोलिसांनी आरोपी शिक्षक विजय ठाकरे याच्याविरुद्ध कलम ३७६, २ (फ) (आय) व बालक लैंगिक अत्याचार अधिनियम कलम ३,४,५, ६ नुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. या घटनेचा तपास वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार, जमादार मनोहर आमने यांनी केला. तपास पूर्ण करून वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्यात सहाय्यक सरकारी वकील जयंत ठाकरे यांनी दहा साक्षिदारांची साक्ष नोंदविली.
वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश के.एन. गौतम यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर शिक्षक विजय ठाकरे याला बालिकेवर अत्याचार प्रकरणात दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला.
दरम्यान, न्यायालयाने शिक्षा सुनावताच, आरोपी शिक्षकाला न्यायालय परिसरात भोवळ आली. त्याच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी संगीत शिक्षकास वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Life imprisonment of a teacher who abused child abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.