पत्नीला जाळून मारणाऱ्यास आजीवन कारावास

By Admin | Updated: December 18, 2014 22:51 IST2014-12-18T22:51:45+5:302014-12-18T22:51:45+5:30

गावातील युवतीसोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर लग्नास नकार दिल्याने तंटामुक्त समितीने विवाहास बाध्य करून विवाह लावुन दिला. विवाहाच्या पाच महिन्यानंतर पत्नीचा गळा दाबुन हत्या केली

Life imprisonment for burning of wife | पत्नीला जाळून मारणाऱ्यास आजीवन कारावास

पत्नीला जाळून मारणाऱ्यास आजीवन कारावास

वरोरा : गावातील युवतीसोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर लग्नास नकार दिल्याने तंटामुक्त समितीने विवाहास बाध्य करून विवाह लावुन दिला. विवाहाच्या पाच महिन्यानंतर पत्नीचा गळा दाबुन हत्या केली व तिला घरातच जाळणाऱ्या पतीस वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
धानोली येथील विकास दडमल असे आरोपी पतीचे नाव आहे. विकासचे गावातील पांडुरंग सोयाम यांची मुलगी सरिता हिच्याशी प्रेमसंबंध जुळले. मात्र, विकासने लग्नास नकार दिला. त्यामुळे प्रकरण तंटामुक्त समितीत गेला. मात्र, विकास मानला नाही. त्यामुळे वरोरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे विकास लग्नास तयार झाला.
वरोरा येथील विठ्ठल मंदिरात विवाह सोहळा पार पडला. सरिता व विकासचा संसार सुरू होता. त्यानंतर विकासने सरिताचा पैश्यासाठी छळ सुरू केला. लग्नाच्या पाच महिन्यानंतर ९ एप्रिल २००८ ला विकासने पत्नी सरिता हिचा घरातील स्वयंपाक खोलीलगत गळा दाबुन हत्या केली व मृतदेह गादीत गुंडाळुन रॉकेलने पेटवुन देत पुरावे नष्ठ करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामस्थ व तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आग विझवित पोलिसांना पाचारण केले.
वरोरा पोलिसांनी विकास विरूद्ध कलम ३०२, २०१ भादंविने गुन्हा दाखल करून अटक केल्यानंतर दोषारोपपत्र वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी वकील जयंत ठाकरे यांनी १४ साक्षीदाराची तपासणी केली.
जिल्हा सत्र न्यायाधीस ई.एन. काझी यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकुन घेतल्यावर विकास दडमल याला कलम ३०२ मध्ये आजीवन कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंड भरला नाही तर ७ वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा तर कलम २०१ नुसार ७ वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Life imprisonment for burning of wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.