शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

जिल्ह्यातील वाचनालये गर्दीने फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 5:00 AM

वर्षांनुवर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करूनही हाती काहीच लागत नसल्याने अनेक बेरोजगार तरुणांनी अभ्यास सोडून छोटा-मोठा व्यवसाय करणे सुरु केले आहे. मात्र प्रत्येकांनाच ते जमण्यासारखे नसल्याने आज-ना उद्या पदभरती होतील. या आशेवर जिल्ह्यातील हजारो युवकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी विविध विषयांचे क्लॉससुद्धा लावले आहे.

ठळक मुद्देअनेकांनी सुरु केला अभ्यास : नव्या सरकारकडून बेरोजगारांच्या आशा वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेत शासकीय नोकरभरतीच होत नसल्याने युवकांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. असे असले तरी नव्या सरकारने महापोर्टलची चौकशी करण्याचे आदेश दिल्याने आता नोकरभरती होतील, या आशेने जिल्ह्यातील बेरोजगारांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला आहे. त्यामुळे वाचनालये गर्दीने फुलले आहे.शिक्षण घेऊन सहजासहजी शासकीय नोकरी मिळत नसल्याने जिल्ह्यातील बेरोजगार तरुण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरी मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून पाहिजे तशी शासकीय नोकरभरतीच घेण्यात आली नसल्याने बेरोजगारांमध्ये नाराजीचा सुर आहे. त्यामुळे काहींनी अभ्यास करणे सोडून दिले. मात्र नवे सरकार स्थापन होताच बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.वर्षांनुवर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करूनही हाती काहीच लागत नसल्याने अनेक बेरोजगार तरुणांनी अभ्यास सोडून छोटा-मोठा व्यवसाय करणे सुरु केले आहे. मात्र प्रत्येकांनाच ते जमण्यासारखे नसल्याने आज-ना उद्या पदभरती होतील. या आशेवर जिल्ह्यातील हजारो युवकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी विविध विषयांचे क्लॉससुद्धा लावले आहे. पदभरती निघेल आणि आपल्याला शासकीय नोकरीत काम करण्याची संधी मिळेल, या आशेवर या युवकांची धडपड सुरु आहे.चंद्रपूर शहराचा विचार केल्यास शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाचनालये आहे. ज्युबिली हायस्कूल परिसरात असलेले शासकीय वाचनालय, श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय, बाबा आमटे अभ्यासिका या व्यतिरिक्त शहरात काही संस्था, संघटना वाचनालयेही सुरु केले आहे. या वाचनालयांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेमध्ये सध्या गर्दी वाढली असून वाचनालये गर्दीने फुलले आहे.बेरोजगार युवकांना नव्या शासनाकडून आशा असून पदभरती निघाल्यास आपण मागे पडू नये, या आशेवर सदर बेरोजगार युवक पुन्हा त्याच जोमाने अभ्यासाकडे वळले आहे. मात्र त्यांची आशा नवे सरकार पूर्ण करते की, पुन्हा त्यांना केवळ अभ्यासच करावा लागतो. हे येणारा काळच सांगणार आहे.औद्योगिक जिल्ह्यात रोजगाराची वानवाचंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र स्थानिक बेरोजगारांच्या हाताला कामच मिळत नसल्याची ओरड आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक खासगी उद्योग बंद आहे. त्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी काहींनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला आहे. मात्र पदभरती होत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा येत आहे.नव्या सरकारकडून अपेक्षा वाढल्यामागील काही वर्षांमध्ये शासकीय पदभरती पाहिजे तशी झालीच नसल्याने बेरोजगार युवकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही संघटनांनी यासंदर्भात आंदोलने, मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र फारसा फायदा झाला नाही. दरम्यान, नवे सरकार स्थापन झाल्यानंतर या बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून नवे सरकार पदभरती करतील, अशी अपेक्षा सध्या बेरोजगार युवकांनी व्यक्त केली आहे.मागील सरकारच्या काळामध्ये अपवाद वगळता पदभरती झालीच नाही. जी झाली त्यामध्ये महापोर्टलचा सर्वत्र गोंधळ बघायला मिळाला. त्यामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. नवेसरकार स्थापन झाल्यानंतर महापोर्टलची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हे सरकार नोकर भरतीसाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे.-पुष्पकांत डोंगरे, चंद्रपूरमागील दोन ते तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहोत. मात्र पदभरतीच झाली नसल्याने अभ्यास सुरुच ठेवला आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर सध्या विद्यार्थ्यांची वाचनालयांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे.-प्रफुल्ल बोरकर, सावली

टॅग्स :Studentविद्यार्थी