लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : नगरपरिषदच्या प्रयत्नांमुळे शहरातील निझामकालीन तलावाचे खोलीकरण करण्यात आले. परिणामी, शहराच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. तलावाच्या बाजूला असलेल्या टेंबीचे सौंदर्यीकरण करण्यात आले. पर्यटकांसाठी येत्या काही महिन्यांत बोटींगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष अरूण धोटे यांनी दिली.राजुरा शहरात स्वातंत्र्यपूर्व कालखंडात निझामाने तलाव बांधला. हा तलाव ऐतिहासिक आहे. शहरातील नागरिकांसाठी संजीवनी देणाऱ्या तलावात गाळ साचला. त्यामुळे पाण्याची पातळी खालावली होती. या तलावामुळे शहराला सौंदर्य प्राप्त होते. शहराच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी तलाव उपयुक्त ठरतो, असा अनेक वर्षांपासूनच अनुभव आहे. मात्र, गाळामुळे जलसाठा कमी झाला. दरम्यान, नगराध्यक्ष अरूण धोटे यांच्या पुढाकाराने तलावाचे खोलीकरण करण्यात आले.यामुळे जलसाठ्यात वाढ झाली. निझामकालीन तलावाच्या सौंदर्यात भर पडली. काही महिन्यांत पर्यटकांशी विविध सोईसुविधा पुरविण्यात येणार आहेत.
तलाव खोलीकरणातून वाढली पाण्याची पातळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:59 IST
नगरपरिषदच्या प्रयत्नांमुळे शहरातील निझामकालीन तलावाचे खोलीकरण करण्यात आले. परिणामी, शहराच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. तलावाच्या बाजूला असलेल्या टेंबीचे सौंदर्यीकरण करण्यात आले.
तलाव खोलीकरणातून वाढली पाण्याची पातळी
ठळक मुद्देअरूण धोटे : पर्यटकांसाठी येत्या काही महिन्यांत बोटींग सुरू होणार