देशविरोधी कार्य करणाऱ्यांना धडा शिकवू
By Admin | Updated: September 4, 2016 00:47 IST2016-09-04T00:47:53+5:302016-09-04T00:47:53+5:30
काश्मिरचा प्रश्न योग्य तऱ्हेने हाताळल्या जात असून लवकरच काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित होईल.

देशविरोधी कार्य करणाऱ्यांना धडा शिकवू
हंसराज अहीर : बुद्धभूमी येथील समाज भवनाचा लोकार्पण सोहळा
राजुरा : काश्मिरचा प्रश्न योग्य तऱ्हेने हाताळल्या जात असून लवकरच काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित होईल. भारताच्या सीमा सुरक्षित असून देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी राजुरा येथील बुद्धभूमी समाज भवनाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी दिला.
कार्यक्रमाला राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यााचे आवाहन केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार धर्मेश फुसाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, भाजपा जिल्हा सरचिटणीस अरूण मस्की, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सतीश धोटे, आदिवासी नेते वाघू गेडाम, किसान आघाडीचे जिल्हा सचिव राजू घरोटे, विनायक देशमुध, भाजपा राजुरा तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, राजुरा शहर अध्यक्ष बादल बेले, तालुका भाजयुर्मो अध्यक्ष सचिन डोहे, रिपाइं नेते चरणदास नगराळे, उपविभागीय बांधकाम विभागाचे एस.बी. टांगले, अभियंता एस. जोशी, रिपाइं नेते सिद्धार्थ पथाडे, राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बी.यू. बोर्डेवार, सचिव अनिल बाळसराफ, मसूद अहमद, संभा दिवे, रघुनाथ उपरे, ऋषी उपरे, गुलाब करमनकर, चालबर्डीचे सरपंच रेखा अलोणे, उपसरपंच शेषराव नागपुरे, विमल पडवेकर, तुळसाबाई खडसे, शोभा कोल्हे उपस्थित होते. प्रास्ताविक चरणदास नगराळे यांनी केले. संचालन आनंद चलाख यांनी केले. आभार श्रीहरी करमनकर यांनी मानले. याप्रसंगी यंग मेन बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीने ना. हंसराज अहीर व आ. अॅड. संजय धोटे यांचा सत्कार करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)