लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST2021-07-22T04:18:39+5:302021-07-22T04:18:39+5:30

चंद्रपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीची कोरपना येथे बैठक पार पडली. यावेळी लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य ...

Let's eat sticks, let's shoot, let's get Vidarbha state | लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ

लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ

चंद्रपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीची कोरपना येथे बैठक पार पडली. यावेळी लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ, अशी शथप कार्यकर्त्यांनी घेतली असून, ९ ऑगस्ट रोजी नागपूर येथील विदर्भ चंडिका मंदिरासमोर केंद्र सरकारने तात्काळ विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे, अन्यथा भाजपाने विदर्भातून चालते व्हावे, असा नारा देत संघर्ष आंदोलन करण्यात येणार आहे. विदर्भातील कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष, माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केले. या बैठकीला अरुण पाटील नवले, नीलकंठ कोरांगे, ॲड. श्रीनिवास मुसळे, सुदाम राठोड, कपिल इद्दे, बंडू राजूरकर, रमाकांत मालेकर, मदन सातपुते, प्रवीण सावकार गुंडावार, रमाकांत मालेकर, अविनाश मुसळे, युवा तालुकाध्यक्ष कार्तिक गोलावार, शहर अध्यक्ष मोहम्मद खान, प्रभाकर लोढे, प्रवीण एकरे, नगरसेवक मधुकर चिंचोलकर, पद्माकर मोहितकर, रामदास कांबळे, सरपंच सत्यवान आत्राम, पांडुरंग आसेकर, अनंता गोडे, विकास दिवे, उपसरपंच गुड्डू काकडे, सुनील आमने आदी उपस्थित होते.

Web Title: Let's eat sticks, let's shoot, let's get Vidarbha state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.