कोरपना शहराचा सर्वांगीण विकास करू-सुभाष धोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:01+5:302021-02-05T07:37:01+5:30
कोरपना : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहून विकास साधू, असे मत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी ...

कोरपना शहराचा सर्वांगीण विकास करू-सुभाष धोटे
कोरपना : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहून विकास साधू, असे मत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी कोरपना नगरपंचायत अंतर्गत शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती श्रीधर पाटील गोडे, जिल्हा बँकेचे संचालक. विजय बावणे, भाऊराव पाटील कारेकर, नगराध्यक्षा कांताताई भगत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उत्तमराव पेचे. सीताराम कोडापे, श्यामबाबू रणदिवे, भाऊजी चव्हाण, सुरेश मालेकर, भारत चन्ने, सुनील बावणे, रसूल पटेल, उपसरपंच अनिल गोंडे, उपनगराध्यक्ष मनोहर चन्ने, नगरसेवक सुभाष तुराणकर, बाबाराव मालेकर, देवराव शिरपूरकर उपस्थित होते. सहाय्य योजना निधी अंतर्गत कोरपना येथील एक ते सतरा प्रभागामध्ये रस्ते, नाली व विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच कोरपना नगरीतील युवा सय्यद कलीम मैनोद्दीन सय्यद यांची केंद्रीय पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आमदार धोटे, जिल्हा बँकेचे संचालक विजय बावणे यांच्या हस्ते करण्यात आला. संचालन प्रशांत लोडे यांनी केले. आभार युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन बावणे यांनी मानले.