स्वयंसेवकामार्फत विद्यार्थ्याना शिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:33 IST2021-09-24T04:33:21+5:302021-09-24T04:33:21+5:30

त्यांना भाषा आणि गणित विषयाचे मूलभूत क्रियाकृती प्रशिक्षण व साहित्य देऊन गावात मोहल्ला वर्ग सुरू करण्यात आले. या वर्गात ...

Lessons taught to students through volunteers | स्वयंसेवकामार्फत विद्यार्थ्याना शिक्षणाचे धडे

स्वयंसेवकामार्फत विद्यार्थ्याना शिक्षणाचे धडे

त्यांना भाषा आणि गणित विषयाचे मूलभूत क्रियाकृती प्रशिक्षण व साहित्य देऊन गावात मोहल्ला वर्ग सुरू करण्यात आले. या वर्गात आपल्या सोयीनुसार दररोज एक ते दोन तास गावातील मुलांना भाषा आणि गणित विषयाच्या माईंड मेप, बाराखडीवरून शब्द तयार करणे, संख्या वाचन, बेरीज, वजाबाकी, खेळ आणि गप्पागोष्टी घेतात. हे वर्ग गावातील उच्चशिक्षित युवती गडबोरीच्या आम्रपाली कुणावार व अभिलाषा जांभूळकर घेत आहेत.

गडबोरी येथे सुरू असलेल्या वर्गाला शिक्षण विभागाचे विषयतज्ज्ञ प्रा. भारत मेश्राम आणि ‘प्रथम’ चे जिल्हा समन्वयक विनोद ठाकरे यांनी नुकतीच भेट देऊन गावातील शिक्षणप्रेमी स्वयंसेवक आणि विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करून गावात स्वयंसेवक पद्धतीने वर्ग घेत असलेल्या आम्रपाली कुणावर यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरव केला.

Web Title: Lessons taught to students through volunteers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.