मंदिरातील स्पिकरवरून शिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST2020-12-14T04:39:57+5:302020-12-14T04:39:57+5:30
फोटो सिंदेवाही : कोरोनाच्या महासंकटामुळे शाळा बंद आहेत. पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि शिक्षणात समाजाचा सहभाग वाढावा, ...

मंदिरातील स्पिकरवरून शिक्षणाचे धडे
फोटो
सिंदेवाही : कोरोनाच्या महासंकटामुळे शाळा बंद आहेत. पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि शिक्षणात समाजाचा सहभाग वाढावा, या उद्देशाने विभागीय आयुक्त नागपूर विभाग, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘शाळे बाहेरची शाळा’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात अंगणवाडी ते वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता आठवडयातून तीन दिवस अभ्यासाचे धडे आकाशवाणी केंद्रावरून प्रकाशित केले जातात. यामध्ये भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, भूगोल आणि इतिहास या विषयावर चर्चा केली जाते. सदर कार्यक्रम स्मार्ट मोबाईलवरसुद्धा ऐकता येतो. परंतु ग्रामीण भागात सर्व पालकांकडे स्मार्ट मोबाईल उपलब्ध नाहीत आणि नेटवर्कसुध्दा कमी असते. अशावेळी प्रथमच्या संकल्पनेतून गावातील युवकवर्ग माता पालक यांना शिक्षणाविषयी जागृत करण्याचे कार्य केले जातात आणि सदर कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गावकºयांच्या मदतीने नवीन कल्पना सुचविल्या जातात. अशी एक कल्पना सिंदेवाही तालुक्यातील वानेरी आणि भेंडाळा गावातील युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी ‘शाळे बाहेरची शाळा’ कार्यक्रम ग्राम पंचायत आणि मंदिराच्या लाऊड स्पिकरवर लावून गावातील सर्व विद्यार्थी आणि पालकांना ऐकविण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, गावचे सरपंच, उपसरपंच, गुरुदेव सेवा मंडळ यांनी पुढाकार घेतला. सदर कार्यक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.