दाताळाच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरावर झेप
By Admin | Updated: September 18, 2015 01:02 IST2015-09-18T01:02:17+5:302015-09-18T01:02:17+5:30
राजीव गांधी इंजिनियरींग कॉलेज चंद्रपूर येथे १४ सप्टेंबरला पार पडलेल्जा जिल्हास्तरीय इन्सपायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद शाळा, ...

दाताळाच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरावर झेप
चंद्रपूर : राजीव गांधी इंजिनियरींग कॉलेज चंद्रपूर येथे १४ सप्टेंबरला पार पडलेल्जा जिल्हास्तरीय इन्सपायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद शाळा, दाताळा येथील इयत्ता सातवीची शुभांगी रामचंद्र काळे व इयत्ता आठवीची श्रेया गोपाल यादव या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या दोघींचीही नागपूर येथे २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय इन्सपायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. दोघींनाही खासदार हंसराज अहीर यांच्या हस्ते गौरवचिन्ह व प्राणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शुभांगी रामचंद्र काळे हिने वॉटर लेवल इंडिकेटर तयार केले. घरच्या छतावर असणाऱ्या सिंटेक्स टाकीतील पाणी ओव्हर फ्लो होऊ नये, यासाठी तिने तयार केलेल्या या प्रतिकृतीची सर्व स्तरावरुन प्रशंसा केली जात आहे. घरोघरी हे उपकरण बसविण्यात यावे, अशी तिची इच्छा आहे.
श्रेया गोपाल यादव हिने लो बजेट एसी तयार केला व अत्यल्प खर्चात गरिबातल्या गरिब नागरिकांना घरी उन्हाळ्यातील दिवसात थंड हवा कशी घेता येईल याचे प्रत्यक्ष सादरीकरण केले.
या प्रदर्शनात जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आईवडील, शाळेचे मुख्याध्यापक गुरुदेव पर्लेवार, प्रफुल्ल आंबटकर, विवेक इत्तडवार, मनिषा चन्नावार, मंजुषा फुलझेले, ज्योती गावंडे यांना दिले.
तिच्या यशाचे केंद्रप्रमुख खोब्रागडे, शिक्षण विस्तार अधिकारी धनपाल फटींग, शशीकांत सोमलकर, सुधाकर महल्ले, राजू लिंगायत सरपंच गीता येडे व गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)