अंगणात गाढ झोपेत असलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 13:00 IST2021-07-14T12:59:45+5:302021-07-14T13:00:08+5:30
Chandrapur News सावली तालुक्यातील व्याहाड बूज येथे मंगळवारी रात्री १० च्या सुमारास झोपेत असलेल्या महिलेवर बिबटयाने हल्ला चढवून तिला ठार केल्याची घटना घडली.

अंगणात गाढ झोपेत असलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: सावली तालुक्यातील व्याहाड बूज येथे मंगळवारी रात्री १० च्या सुमारास झोपेत असलेल्या महिलेवर बिबटयाने हल्ला चढवून तिला ठार केल्याची घटना घडली.
ंगंगूबाई रामदास गेडाम (४६) असे मृत महिलेचे नाव आहे. ती व्याहाड बूज येथील मुराड भागात आपल्या पतीसह रहात होती. तिचा पती रामदास हा घरात झोपला होता व ती घरासमोरील मोकळ््या जागेत झोपली होती. रात्रीच्या वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला. याआधीही त्यांच्या घरातील शेळीला बिबट्याने ठार केले होते. दरम्यान, सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी व चमु घटना स्थळी पोहचली असुन पुढील तपास सुरू आहे