गावाच्या वेशीवर बिबट्याचा हल्ला, महिला जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:56 IST2020-12-04T04:56:51+5:302020-12-04T04:56:51+5:30
डोर्ली (चिचगाव) या गावाला लागूनच जंगल आहे. ग्रामीण भागात खताचे ढिगारे शक्यतो गावाच्या सीमेवर ठेवल्या जातात. डोर्ली (चिचगाव) येथेही ...

गावाच्या वेशीवर बिबट्याचा हल्ला, महिला जागीच ठार
डोर्ली (चिचगाव) या गावाला लागूनच जंगल आहे. ग्रामीण भागात खताचे ढिगारे शक्यतो गावाच्या सीमेवर ठेवल्या जातात. डोर्ली (चिचगाव) येथेही अशीच स्थिती आहे. तारा खरकाटे ही महिला नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजताच्या सुमारास शेणखत फेकण्यासाठी गावाबाहेर गेली होती. दरम्यान, दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून काही अंतरावर फरफटत नेले. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व मेंडकी ठाण्याच्या पोलीस पथकाने पंचनामा केला. बिबट व वाघाच्या हल्ल्याच्या घटना सतत वाढत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. वनविभागाने रस्त्यालगतच्या झाडाझुडपांची सफाई तसेच बिबट व वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.