जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST2021-02-05T07:43:36+5:302021-02-05T07:43:36+5:30
चंद्रपूर : जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्यावतीने बंदीबांधवाकरिता कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर नुकतेच पार पडले. अध्यक्षस्थानी ...

जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
चंद्रपूर : जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्यावतीने बंदीबांधवाकरिता कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर नुकतेच पार पडले. अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक वैभव आगे तर मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. डी. डी. फुलझेले तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त वरिष्ठ तुरुंगाधिकारी रवींद्र जगताप, तुरुंगाधिकारी नागनाथ खैरे, तुरुंगाधिकारी विठ्ठल पवार, तुरुंग शिक्षक ललित मुंडे उपस्थित होते.
न्या. डी. डी. फुलझेले यांनी बंदीबांधवांना विधी सहाय्य व कायदेविषयक मार्गदर्शन करताना प्रोबेशन ऑफेंडर्स ऍक्ट, सी.आर.पी.सी, ४३६, ४३७-ए, ४३७ - पोटालम ६ आदींच्या लाभाबाबत मार्गदर्शन केले, तर कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी कारागृहातील बंद्याचे अधिकार, जामीन मिळण्याचा अधिकार, कायदेविषयक सुविधा याबाबत माहिती दिली. प्रास्ताविक अतिरिक्त वरिष्ठ तुरुंगाधिकारी रवींद्र जगताप, संचालन तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केले. यशस्वीतेसाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी वैभव आत्राम, तुरुंगाधिकारी नागनाथ खैरे, सुनील वानखडे, विठ्ठल पवार, कारागृहाचे सुभेदार, देवाजी फलके, शिवराम चवळे, सीताराम सुरकार, शिपाई लवकुश चव्हाण, राजेंद्रसिंग ठाकूर, विजय बन्सोडे आदी उपस्थित होते.