भद्रावती येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
By Admin | Updated: March 15, 2017 00:36 IST2017-03-15T00:36:44+5:302017-03-15T00:36:44+5:30
महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकारण, उच्च न्यायालय मुंबई व जिल्हाविधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती भद्रावती

भद्रावती येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
भद्रावती: महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकारण, उच्च न्यायालय मुंबई व जिल्हाविधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती भद्रावती आणि तालुका विधीतज्ज्ञ संघ भद्रावती यांच्या पुढाकारातून येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात विविध विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर शुक्रवारला पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एन. ए. इंगळे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सह दिवाणी न्यायाधीश एस. यु. कंठे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका विधीज्ज्ञ संघाचे ज्येष्ठ अधिवक्ते ए. जे. तामगडे तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका विधीतज्ज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. यु. ए. पलिकुंडवार, सचिव जी. पी. गोरे उपस्थित होते. अॅड. तामगडेयांनी मोटार अपघात नुकसान भरपाईची न्यायाधिकरण प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन करताना मृत्यू पावलेल्या कुटुंबाना नुकसान भरपाई कशी मिळते, अर्ज कशाप्रकारे व कोठे करायचा, इन्शुरन्स कंपनीकडून पैसे कसे मिळविता येतात. चालकाने आपल्या वाहनाचा विमा चालू ठेवणे, विमा न काढल्यास कशाप्रकारे हाणी होते, प्रवाशांनी कोणत्या गाडीत बसावे व कुठे बसू नये याबाबत माहिती दिली.
एन. ए. इंगळे यांनी मध्यस्थती केंद्राबाबत माहिती आणि कायदे या विषयावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी मध्यस्थी केंद्राद्वारे आपले प्रकरण कशाप्रकारे निपटवता येते. व त्याद्वारे आपला कसा फायदा होतो हे समजून सांगितले. संचालन व आभार अॅड. व्ही. एस. सुर्तीकर यांनी केले (तालुका प्रतिनिधी)